By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 31, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
तशी त्याची आणि तिची ओळख फेसबुकवरचीच. म्हणजे ती त्याला तशी नावाने ओळखत होती एक वर्षापासून, पण त्याने तिला ओळखायचं काही कारणच नव्हतं. तरी ती त्याला ओळखत होती याचा अर्थ तो कुणी celebrity अज्जीबातच नव्हता. साधारण दोन एक वर्षापूर्वी तिच्या अलिबाग मध्ये असलेल्या शाळेचं grand get together होतं. नवऱ्याने सुद्धा अगदी हौसेने पाठवलं होत म्हणून ती गेली. त्या सगळ्या कार्यक्रमात तो अगदी केंद्रस्थानी होता. म्हणून ती त्याला ओळखत होती इतकंच. थोडक्यात काय तर तो स्टेजवर आणि ती प्रेक्षकांमध्ये.
तिथून परत आल्यावर अचानक त्याची फ्रेंड रिक्वेस्ट आली फेसबुकवर . तिला तर आश्चर्यच वाटलं कि याने मला कशी काय रिक्वेस्ट पाठवली बरं? पण शाळेतलेच बरेच जण mutual friend मध्ये दिसले आणि मुळात शाळाच जिथे mutual होती तिथे मग जास्त विचार न करता तिने ती accept करून टाकली. वर्ष दीड वर्ष असंच गेलं. त्याने पण कधी inbox मध्ये घुसायचा प्रयत्न केला नाही कि हि सुद्धा कधी गेली नाही बोलायला. ज्या काही पोस्ट दिसायच्या त्या कधी मधी like केल्या जायच्या इतकंच. मग एक दिवस अचानक त्याने एक लिंक पाठवली inbox मध्ये. फार काही विशेष नव्हती, कुठल्या तरी सामाजिक उपक्रम करणार्या संस्थेविषयी होती. तेव्हा थोडं बोलणं झालं. त्याला वाटलं कि तिला अशा काही कामाची आवड असावी म्हणून मग त्याने त्याचा नंबर दिला आणि काही काम करणार असशील तर सांग अस सुचवलं. हि तर आधीच भारावून गेली होती त्याच्या एकंदरीत कामामुळे, आणि त्याच धुंदीत फोन पण केला. जनरल बोलणं झालं. पुन्हा काही महिने असेच गेले आणि मग दसरा आला. तेव्हा त्याने तिला inbox मध्ये शुभेच्छा दिल्या आणि मग त्यांच्या चक्क गप्पाच सुरु झाल्या. दिवसभर नुसत्या गप्पा अर्थात फेसबुकच्या inbox मध्ये. अजूनही तिने आपला नंबर त्याला दिला नाही आणि त्याने मागीतलाही नाही.
अगदी आयुष्य भराच्या गप्पा मारल्या त्यांनी आणि काय काय secrets share केली. कधी वाटलंही नव्हतं त्यांना कि इतकी जवळीक होईल. आत्तापर्यंत तिचे सगळे फोटो पाहून आणि like करून झाले होते. ती दिसायला तशी फार सुंदर नव्हती पण आकर्षक नक्कीच होती आणि एकदा पहाणारा माणूस पुन्हा नक्की पाहिलं इतपत बघणेबल होती. मग अचानक तो म्हणायला लागला कि तू खूप छान आहेस, मला खूप आवडली आहेस. छान आहे इथपर्यंत ठीक होत पण आवडली आहेस म्हणजे नेमकं काय करायचं याचा बोध काही तिला होईना. अर्थात ती सुद्धा तशी काही अगदी अजाण किंवा निरागस अशी काही नव्हती पण त्याच्याबद्दल तिला ते फिलिंग येत नव्हत जे त्याला तिच्यासाठी येत होतं एक मित्र किंवा अगदी जवळचा मित्र म्हणून तो खूप छान होता पण त्यापेक्षा जास्त नक्कीच काही नाही. तरी एकदा त्याच्या आग्रहावरून सगळा धीर गोळा करून ती त्याला भेटली सुद्धा. तर तेव्हाही त्याचं तेच सुरु कि या अशा मैत्रीला काही अर्थ नाही, तू मला हवी आहेस नाहीतर आपलं बोलणं थांबवूया. काय विचित्र प्रकार हा…. तिने मग ठामपणे सांगितल कि थांबवूया बोलणं. आणि मी तुला हवी म्हणजे नेमक काय हवं रे? मी आहेच कि तुझी मैत्रीण, गप्पा मारतोच कि आपण, खूप गोष्टी शेअर सुद्धा केल्यात आपण. यापेक्षा जास्त काय हवं तुला? आणि जे तुला हवं ते कदाचित मी तुला दिलं सुद्धा असतं पण मला तुझ्या बद्दल तस काही फिलच होत नाही रे. आणि मन मारून उगीच असं काही करायला मी काही professional lady नाही, कि हे असं काही केल्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नाही. उगीचंच मला वाटलं कि आपण मित्र आहोत….
नुसती मैत्री कधीच का होऊ शकत नाही? निदान तिच्या बाबत तरी हे शक्य होईल अस नाही वाटत....
पुण्यात आल्यावर पुण्याची उणी दुणी काढणे हे मुंबईकरांचे पाहिले काम पण तरी ए....
अधिक वाचा