ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्वयंपाक करणे : Stress Buster ? ? ?

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 17, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्वयंपाक करणे : Stress Buster ? ? ?

शहर : मुंबई

स्वयंपाक घर हे स्त्रियांसाठी stress buster असतं म्हणे किंवा स्वयंपाक करणे म्हणजे मनावर आलेला एक प्रकारचा थकवा दूर करणे होय असं मी कुठे तरी वाचलं होतं. बहुतेक FB वरच वाचलं असणार. हल्ली अवांतर वाचन जरा कमीच झालंय. थोडं चमत्कारीकंच वाटलं असं वाचून. अगदी पूर्वीपासूनच रांधा, वाढा उष्टी काढा यातून बायकांना सुटका कशी ती नाहीच... त्यात आता बायका नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत घड्याळाच्या काट्यावर स्वार होऊन करत असतात. कदाचित उष्टी काढण्याच्या कामातून सुटका झाली असेल, पण तरी संध्याकाळी घरी येईपर्यंत अर्धा जीव गेलेलाच असतो..... त्यात पुन्हा स्वयंपाक करून कसला मेला थकवा दूर होणार?

नोकरी करणाऱ्या बायकांची हि अवस्था तर २४ तास घरात राहणाऱ्या बायकांची अजूनच वेगळी तऱ्हा... कायम घरात असल्यामुळे घरातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता करता अक्खा जीव जात असेल रोज. बरं कंटाळा आलाय असं म्हणायची सोय नसेलच त्यांना कारण '२४ तास घरात तर असतेस तर दुसरं काम तरी काय तुला' असे प्रश्न असणारी नजर जाळत असेल त्यांना. मला काही हा अनुभव नाही कारण मी पहिल्या कॅटेगरीत मोडते.

खरं तर लहानपणापासून मला स्वयंपाक करणे या प्रकारचा भयंकर कंटाळा. लग्न होईपर्यंत पोळ्या लाटणं तर राहुद्याच पण चहा सुद्धा करता येत नव्हता. बऱ्याच मुलींना आईच्या मागे मागे स्वयंपाक घरात लुडबुड करायची सवय असते, पण मी आईने १० हाका मारल्या तरी अजिबात तिकडे फिरकत नसे. माझी लहान बहीण बिचारी कायम आईच्या मागे मागे असे.

मला आठवतंय माझ्या लहानपणी आम्ही भातुकली खेळत असू..... तेव्हा सुद्धा मी कधी स्वयंपाक करायच्या भानगडीत पडत नसे. आता भातुकलीतला स्वयंपाक बिघडून बिघडून असा काय बिघडणार? पण इथे आवडंच नाही तर बिघडायची भीती कसली? तेव्हा सुद्धा इतर मैत्रिणी स्वयंपाक करायच्या आणि मी आईची जुनी पर्स घेऊन आणि गॉगल लावून ऑफिसला जायची... पगार झाला कि नवा व्यापारमधल्या नोटा पैसे म्हणून घरात खर्च करायला द्यायची. नोकरी करायची हौस अगदी तेव्हापासूनचीच....

'लग्नानंतर कसं होणार गं तुझं?' हा प्रश्न आईला कायम पडलेला असायचा आणि मी पण तितक्याच रुबाबात आईला सांगायचे "नोकर ठेवेन गं स्वयंपाक करण्यासाठी, पैसे कमावता आले कि सगळं शक्य होतं." आज हे आठवतं तेव्हा हसूच येतं. स्वयंपाकासाठी नोकर ठेवणं राहीलं बाजूलाच पण माझ्याकडे साधी धुणी भांडी करायला सुद्धा बाई नाही. इथे प्रश्न पैशाचा नसून माझ्यात अज्जीबात पेशन्स नसल्याचा आहे. बाईची वाट पाहणे, तिच्यावर खुपश्या कामांसाठी अवलंबून राहणे, ती नाही आली तर तिच्यामुळे राहिलेली कामं स्वतः करणे आणि यामुळे आपल्या इतर कामांचा खोळंबा करून घेणे ..... बाई गं, एका बाईसाठी नकोच इतकं. त्यातून नवरा सुद्धा घरातल्या प्रत्येक कामात मदत करतो, त्यामुळे बाईची उणीव कधी जाणवलीच नाही.

बरं आमच्या घरात जेवण या प्रकारचं तितकं मोठं खटलं नाहीये. मी धरून घरात फक्त ३ माणसं... आहार पण अगदी मोजून मापून. खाण्यापिण्याच्या कसल्याही कटकटी किंवा विशेष आवडी निवडी नाहीत. ज्या दिवशी मनाला जे येईल ते शिजवते... मग अगदी सोमवारी फिश करी सुद्धा होते आणि रविवारी इडली चटणी किंवा दाल खिचडी हे आमचं जेवण असतं. त्यातुन घरी आल्यावर फक्त "आज कंटाळा आलाय" हे वाक्य तोंडातून काढायची खोटी.... कि बाप लेक ड्रॉवर मधली ३ - ४ मेनू कार्ड्स काढून लगेच काय मागवायचं याचं चर्चासत्र सुरु करतात.

थोडक्यात काय तर माझ्यासाठी स्वयंपाक करण्यापेक्षा त्यातून सुटका हाच थकवा कमी करण्याचा उपाय आहे.

मागे

शाळा निवडतांना कुठले बोर्ड घ्यावे?
शाळा निवडतांना कुठले बोर्ड घ्यावे?

शाळा निवडतांना कुठले बोर्ड घ्यावे? पालक शाळा निवडतांना, “बोर्ड कुठ....

अधिक वाचा

पुढे  

14 फेब्रुवारी 2019! भारतीय इतिहासातील काळा दिवस
14 फेब्रुवारी 2019! भारतीय इतिहासातील काळा दिवस

14 फेब्रुवारी 2019! भारतीय इतिहासातील काळा दिवस.  नेमके त्याच दिवशी काही व्यक्....

Read more