ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हवा नवा तो नूर!

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2019 03:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हवा नवा तो नूर!

शहर : मुंबई

         आणखी दोनच दिवसांनी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून आपण सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत. खरे तर आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत गुढी पाडव्यापासून म्हणजेच चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून नव्या वर्षाला प्रारंभ होतो. तथापि व्यवहारी जगात इंग्रजी कालगणनेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. शिवाय सर्व जगाचे व्यवहार हे इंग्रजी दिनदर्शीकेनुसार (कॅलेंडर) चालतात. आपल्याकडेही तीच स्थिति आहे. सहजिकच डिसेंबर महिन्याच्या ३१ तारखेला सरत्या वर्षाला सर्व जग निरोप देते. आणि नव्या वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करते. आपण भारतीयही उत्सवप्रेमी आहोत. उत्सवांमध्ये सहभागी होणे हा मानवी स्वभाव आहे. आपले सण उत्सवांप्रमाणेच आपणही या नववर्षाच्या स्वागताच्या उत्सवातही आपण कधी सहभागी झालो ते कळलेच नाही. आता तर ३१ डिसेंबरची वाट मोठ्या उत्सुकतेने अनेक जण पहात असतात. त्यासाठी काही दिवस आधीच नियोजन करतात. नाताळ पासून ३१ डिसेंबरपर्यंत नववर्ष स्वागताची जय्यत तयारी सुरू होते.

 

          आता नववषाचे स्वागत म्हणजे काय? सास्तविक गेल्या वर्षे भारत घडलेल्या अनेक बर्‍याच वाईट घटकांचा आढावा घेणे, आपल्या जीवनात घडलेले आनंदाचे क्षण असतील, दुख:चे प्रसंग असतील, यश अपयशाचे आलेले अनुभव असतील त्यांचे स्मरण करीत नव्या वर्षाची आखली नव्याने करायची असते. गेल्या वर्षात झालेल्या चुका, आलेल्या अपयशाचे प्रसंग लक्षात ठेवून नवी झेप घेण्याचे संकल्पला नवी ध्येय नवी उद्दिष्टे आणि त्यासाठीचे काटेकोर नियोजन करून ते अंमलात आणल्याचा नवा उत्साह अंगी संचारणे गरजेचे आहे. भूतकाळातील चुका अपयश गोंजारीत व्यसनामध्ये दुबून जातात. वास्तवतेचे भान राखीत परिस्थितीवर मात करण्याची जिद्द बाळगली पाहिजे.

 

            कारण या नश्वर जगात शाश्वत काहीच नसते. येथे नेहमीच परिवर्तन घडत असते. कित्येक वर्ष केंद्रात सत्ता गाजविणारे कॉंग्रेस नेते आज विरोधी बाकावर दिसत आहेत. महाराष्ट्रात मी पुन्हा येणार, असे सांगणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विरोधी पक्षनेते पदावर आहेत. फुलं आणि फुलपाखरं याचं आयुष्य अल्पकाळ असतं क्षणभ्ंगूर असतं. पण ती नेहमीच आनंदी असतात. दुसर्‍यालाही आनंद देतात. जीवन कसं जगावं हे त्याच्याकडून शिकावं. निसर्गात शिकण्यासारखा अशा खूप गोष्टी आहेत. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

 

         आता नववर्षाचं स्वागत म्हणजे ३१ डिसेंबरला जंगी पार्ट्यामध्ये डी.जे च्या दणदणाटात विचित्र अंगविक्षेप करीत बेहोश होऊन काचणे, शुद्ध हरपून जाईल इतकी नशा करणे, त्यासाठी प्रचंड खर्च करणे असले प्रकार सुरू झाले आहेत. अशा पार्ट्या आयोजन करणारेही याच संधीची वाट पाहत असतात. वर्षातून एकदाच अशी संधी मिळते, असे म्हणणारे बहुसंख्य पार्टीप्रेमी पुढे वर्षभर थंडच बसतात का ? तर काही कित्येक जन टेंन्शनमुळे व्यसनाच्या आहारी गेल्याचे रडगाणे गातात. यातही तसे फारसे तथ्य नसते. पाण्याची संतत धारही काळ्या कभिन्य कातळाला फोडते. असा दृढनिश्चय आणि संयम असायला हवा. आज प्रत्येकाला झटपट यश श्रीमंती हवी असते. त्यासाठी कित्येक जन नैराश्यग्रस्त होतात. चिकाटी हवी. भूतकाळाचे अवलोकन करीत वर्तमानात वाटचाल करताना भविष्य आपल्या हातून निसटणार नाही, हे पहिले पाहिजे. नाटककार पुरूषोत्तम दारव्हेकरांच्या कट्यार काळजात घुसली या नाटकातील एका गीतात दोन प्रेरणादायी ओळी आहेत त्या अशा.

                                                     नवे सुर अनू नवे तराणे          

                                                         हवा नवा तो नूर

                                                   जाऊ द्या दूर जुने ते सुर |

                    आपणही आशावादी होत नवे संकल्प करीत नववर्षाचे स्वागत करूया |

Recommended Articles

मागे

वडाच्या पारावार - कमळ कोमेजताच हात सरसावला
वडाच्या पारावार - कमळ कोमेजताच हात सरसावला

संत्या : हाताला १३४ वरसं झाली बगा. गण्या : हाताला नाय रं कॉंग्रेसला म्हन. सं�....

अधिक वाचा

पुढे  

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात गारठा तर विदर्भ, मराठवाड्यात पाऊस
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात गारठा तर विदर्भ, मराठवाड्यात पाऊस

       राज्याच्या अनेक भागांत सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती असल्याने क....

Read more