ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सूर्य पाहिलेला माणूस

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

           सूर्य पाहिलेला माणूस

शहर : मुंबई

             डॉ.श्रीराम लागू गेले. मराठी रंगभूमीवरील "नटसम्राट" निवर्तला. देवाला रेटायर करा असं निर्भीडपणे सांगणारा सत्यवादी काळाच्या पडद्याआड गेला. मास्तर पिंजरा सोडून अनंताच्या प्रवासाला गेला. मराठी रंगभूमी बरोबरच मराठी चित्रपट आणि हिन्दी चित्रपटसृष्टीतही विविध भूमिका आपल्या कसदार अभिनयाने वटवून त्यांनी आपला ठसा उमटविला होता. मराठी मानसाच्या अंगातच कटक मुरलेल असतं. असं म्हंटलं तर वावगे ठरू नये. डॉ.लागू हे त्याच एक उत्तम उदाहरण आहे. डॉक्टरकीचा पेशा सोडून ते नाटकाच्या वेडापायी रंगभूमिकडे वळले आणि अखेरपर्यंत ते सहजपणे वावरले. रंगभूमीवरचा अभिनेता चित्रपटसृष्टीत टिकवतोच असे नाही. मोजक्याच अभिनेत्यांना ही किमया करता येते. डॉ.लागू यांनी ती करून दाखविली.
            डॉ.लागू जसे उत्कृष्ट अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते तसेच ते प्रज्ञावान व प्रखर बुद्धिवादी म्हणूनही परिचित होते. १६ नोहेंबर १९२७ रोजी डॉ.लागू यांचा जन्म सातारा जिल्हयात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळकृष्ण आणि आईचे नाव सत्यभामा होते. डॉ.लागू यांनी पुण्यातील भावे स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कॉलजमध्ये असतानाच त्यांनी अनेक नाटकातून काम केले. एम.बी.बी.एस पदवी मिळवल्यानंतर त्यांनी पुण्यात ई.एन.टी सर्जन म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. मात्र त्यांच्यातील अभिनेता अस्वस्थ होता. म्हणून पुण्यातील प्रा.भाळबा केळकर यांच्या प्रसिद्ध असलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रमेटिक असोसिएशच्या या संस्थेत ते सहभागी झाले. या संस्थेच्या अनेक नाटकातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांचं वाचनही दांडग होतं. पीडीएप्रमाणे त्यांनी मुंबईत विजया मेहता व अरविंद देशपांडे प्रभृतीच्या रंगायन या संस्थेच्याही अनेक नाटकातून कामे केली. 
       डॉक्टरकी आणि नाटक यामध्येच त्यांची कसरत सुरू होती. १९६० च्या दशकात मेडिकल प्रॅक्टीस आणि आठवड्याच्या शेवटी नाटकाचे प्रयोग असं त्यांचं जीवन धावपळीत सुरू होतं. मध्यंतरी ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंड व कॅनडाला गेले. त्यानंतर ते आफ्रिकेत टांझानिया या देशातही होते. या काळात ते मराठी रंगभूमीपासून लांब असल्याची जाणीव त्यांना अस्वस्थ करीत होती. इंग्लंडमध्ये त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग पहिले. त्यांचे नाट्याविषयक चिंतन सतत चालूच होते. टांझानियाच्या किलिमांजारो या पर्वतावर गिर्यारोहण करायला गेले असताना त्यांनी पूर्णवेळ नाटक-अभिनयालाच वाहून घेण्याचा निर्णय घेतला. 
       मुंबईत आल्यानंतर सुदैवाने त्यांना धी गोवा हिंदू असोसिएन या प्रख्यात सस्थेचे आमंत्रण मिळाले. विख्यात नाटककार वि.वा.शिरवाडकर यांच्या नटसम्राट नाटकाची निर्मिती या संस्थेने करण्याचे ठरविले होते. या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांची प्रमुख भूमिका पेलण्याचे आव्हान डॉ.लागू यांनी स्वीकारले. मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात २३ डिसेंबर १९७० रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि डॉ.लागू यांच्या रूपाने मराठी रंगभूमीवर खरा नटसम्राट अवतरला. तेव्हापासून डॉ.लागू यांनी मागे वळून पहिले नाही. खरे तर तत्पूवी डॉ.लागू यांनी डॉक्टरी पेशला रामराम ठोकत १९६९ मध्ये प्रा.वसंत कानेटकर यांच्या इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून आपल्या कारकिर्दीला नव्याने सुरुवात केली.          
        डॉ.लागू उत्कृष्ट अभिनेते होतेच पण त्याचबरोबर ते नाटककार, दिग्दर्शक आणि सामाजिक सुधारणाचे पुरस्कर्ते म्हणूनही परिचित होते. त्यांची चित्रपती व्ही.शांतराम यांच्या 'पिंजरा' सिनेमातील भूमिकाही खूप गाजली. शिवाय 'सामना' तील त्यांची निळू फुले यांच्या समवेतची जुगलबंदीही चांगलीच रंगली. सिहासनमधील मंत्र्याची भूमिकाही त्यांनी तेवड्याच ताकदीने साकारली. लावारीस या हिन्दी चित्रपटात बीग बी अमिताभ बच्चन बरोबरही काम करताना त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. अशाप्रकारे १२५ हून अधिक मराठी आणि हिन्दी चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या.
        याशिवाय त्यांनी अग्निपंख, आकाश पेलताना, एकच त्याला, आंधळ्याची शाळा, काचेचा चंद्र, गिधाडे, चंद्र आहे साक्षीला, वेड्याचं घर उन्हात, सूर्य पाहिलेला माणूस, हिमालयाची सावली, पुण्यप्रभाव, पप्पा सांगा कुणाचे, उद्याच्या संसार आदी ५० हून अधिक नाटकांमध्ये कामे केली. अनेक चढउतार पहिले. प्रत्येक प्रसंगाला त्यांनी मोठ्या धैर्याने तोंड दिले. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असायचा त्यांचा निधनाने अभिनयाचा सूर्यच त्यांच्या रूपाने अस्ताला गेला. त्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !    
       
 

मागे

जनसामान्यांना आपलंसं करणारा नेता
जनसामान्यांना आपलंसं करणारा नेता

भारतीय जनता पार्टीच्या बांधणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा गोपीनाथराव मु....

अधिक वाचा

पुढे  

खासदार कमी आहेत का?
खासदार कमी आहेत का?

          आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे 130 कोटीहून अधिक आहे. वाढत्या ल....

Read more