ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

People's President डॉ.अब्दुल कलाम: पोखरणचा हिरो आणि खऱ्या अर्थाने 'फकीर'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2020 02:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

People's President डॉ.अब्दुल कलाम: पोखरणचा हिरो आणि खऱ्या अर्थाने 'फकीर'

शहर : मुंबई

'पीपल्स प्रेसिडेंट' म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ..पी.जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती. राष्ट्रपती म्हणून आपला कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना केवळ एक सुटकेस घेऊन राष्ट्रपती भवन सोडताना अनेकांनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ 2500 पुस्तके, 6 पँट्स, 4 शर्ट, 16 डॉक्टरेटच्या पदव्या, एक पद्मश्री, एक पद्मभूषण आणि भारताचा सर्वोच्च किताब भारतरत्न एवढीच संपत्ती होती.

त्यानी आपल्या कारकीर्दीत भारताला अनेकवेळा अभिमान वाटावा असे काम केले. मग ते इस्रोचे आणि डीआरडीओचे प्रमुख म्हणून कार्य असो, भारताचं पहिलं रॉकेट एसएलव्ही-3 बनवण्यात बजावलेली भूमिका असो, 'पृथ्वी' आणि 'अग्नी' क्षेपणास्त्र असो किंवा जगाला भारताची ताकद दाखवणारा पोखरणचा स्फोट असो. त्यांच्या प्रत्येक कामगिरीने देशाची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचच झाली आहे. पण एवढ्यापुरतंच त्यांच कार्य मर्यादित नाही. त्यांची खरी ओळख ही शिक्षक हीच होती आणि तिच त्यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपली.

अगदी राष्ट्रपती असतानाही त्यांनी देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधला. लहान होऊन त्यांच्यात रमले, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्याशी आपले अनुभव शेअर केले तेही त्यांना लहानपणी गरिबीला तोंड द्याव्या लागलेल्या परिस्थितीचा कोणतीही बागुलबुवा करता.

ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नेहमी त्यांना कानमंत्र द्यायचे. ते म्हणायचे की, "तुम्ही झोपेत पाहता ते स्वप्न नव्हे तर तुम्हाला झोपू देत नाही ते स्वप्न असते." त्यापुढेही जाऊन ते म्हणायचे की, "कोणतेही स्वप्न हे मोठे नसते आणि कोणताही स्वप्न पाहणारा व्यक्ती हा लहान नसतो, भविष्य त्याचेच असते जो स्वप्न पाहतो आणि ते सत्यात उतरवतो." ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेकांसाठी ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायी होते.

आजच्याच दिवशी 1931 साली तामिळनाडूतील रामेश्वरम येथे जन्म झाला. तिथपासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रवासाने वैज्ञानिक ते भारताचे राष्ट्रपती असा थक्क करणारा पल्ला गाठला. या काळात त्यांनी अनेक यश अपयश पचवले. अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांनी त्यांना भारताचा 'मिसाईल मॅन' म्हणून आकाशाला गवसणी करणारी ख्याती मिळवून दिली. तरीही या अवलियाचे पाय सतत जमिनीवरच राहिले हे आश्चर्य आहे.

भारतासमोर दारिद्र्याची एवढी मोठी समस्या असताना आपण क्षेपणास्त्रांची चाचणी करणे योग्य आहे का असा प्रश्न त्यांना विचारल्यावर ते म्हणायचे की, "एखादी शक्तीशाली व्यक्तीच दुसऱ्या शक्तीशाली व्यक्तीचा आदर करते. त्याप्रमाणे एक शक्तीशाली देशच दुसऱ्या शक्तीशाली देशाचा आदर करतो. भारताला जर महासत्ता व्हायचे असेल तर आधी शक्तीशाली होणं गरजेचं आहे."

ते म्हणायचे की जर तुम्हाला एखादे यश मिळाले तर त्यानंतर क्षणभराचीही विश्रांती घेऊ नका. तसे झाल्यास पुढे थोडे जरी अपयश पदरात पडले तरी लोक तुमच्या त्या यशाला नशिबाने मिळालेली गोष्ट संबोधतील.

आपल्या देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे प्रतिक म्हणून दरवर्षी आपण 11 मे रोजी National Technology Day साजरा करतो. या दिवसाचे आणि अब्दुल कलामांचे एक विशेष नाते आहे. याच दिवशी 1998 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पोखरण येथे आण्विक चाचणी घऊन जगाला धक्का दिला होता. या घटनेने भारताची ताकद जगासमोर आली. ही चाचणी अमेरिका आणि जगाच्या नजरेला चुकवून करायची होती. त्याची कुणकुण आधीपासूनच अमेरिकेला होती. त्यामुळे त्याच्या आधी काही वर्षांपासून अमेरिकेचे सॅटेलाईट भारतावर 24 तास नजर ठेऊन होते. तसेच त्यांची गुप्तहेर संघटना CIA ही देखील भारतात कार्यरत होती. यांना चकवा देऊन पोखरणची चाचणी यशस्वी करण्याची जबाबदारी डॉ. कलामांवर येऊन पडली.

या आधी 1974 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी 'स्मायलिंग बुद्धा' या नावाने देशाची पहिली अणूचाचणी केली होती. त्यानंतर भारताला अमेरिकेच्या बंधनांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही भारताने त्याचा अणुकार्यक्रम सुरुच ठेवला होता.

1995 साली नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी अशी अणुचाचणी घेण्याचा प्रयत्न केला होता. पण याची खबर अमेरिकेला आधीच लागली होती. त्यांनी भारताला अशी चाचणी घेतली तर जागतिक प्रतिबंध घालण्याची धमकी दिली. 1991 च्या आर्थिक संकटातून बाहेर येत असलेल्या भारताला ही बंधनं परवडणारी नव्हती. त्यामुळे अणुचाचणीचा निर्णय पुढ ढकलला.

त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली. त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी डॉ. कलामांवर सोपवली.

अमेरिकेच्या CIA या गुप्तहेर संघटनेने भारताच्या अणु कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी चार सॅटेलाईट लावले होते. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे घेऊन जाणे हे एक आव्हान होते. अशा वेळी भारतीय शास्त्रज्ञांना समजले की, रात्री काम केल्यास आपण सॅटेलाईटच्या कक्षात येणार नाही. काम करतानाही त्यांनी कोणाला शंका येऊ नये म्हणून संभाषण कोड लॅंग्वेजमध्ये केले.

अणुचाचणीच्या दिवशी म्हणजे 11 मे 1998 रोजी अब्दुल कलामांसहित सगळे शास्त्रज्ञ भारतीय लष्कराच्या वेशात पोखरण येथे पोहोचले. तसेच अण्वस्त्रांनाही लष्कराच्या ट्रकमधून जैसलमेर येथून पोखरण यथे आणण्यात आले. दुपारी त्याची चाचणी करुन पोखरण मिशन यशस्वी करण्यात आले.

या सर्व घटनांत डॉ. अब्दुल कलाम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदान लक्षात घेता त्यांना 1997 साली 'भारतरत्न' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे मंत्रिपद देऊ केले होते, पण त्यांनी ते विनम्रपणे नाकारले. पुढे जाऊन वाजपेयींनीच त्यांना राष्ट्रपती बनवण्यात मोठी भूमिका पार पाडली.

आयुष्यभर केलेल्या संघर्षाचा कोणताही गाजावाजा करता, अवकाशाला गवसणी घालणाऱ्या अण्वस्त्रांचा शोध लावतानाही पाय नेहमी जमिनीवर घट्ट रोवणाऱ्या या खऱ्या अर्थाने निस्वार्थी असणाऱ्या फकीराचे जीवन तमाम भारतीयांना कायम प्रेरणा देत राहिल.

मागे

वाईट काळात कलाम सरांच्या या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा !
वाईट काळात कलाम सरांच्या या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा !

मित्रांनो ही गोष्ट आहे 2002 ची, वर्तमानपत्रापासून ते "टी व्ही" पर्यंत फक्त ए....

अधिक वाचा

पुढे  

मॅजिकल व्हॅलेंटाईन
मॅजिकल व्हॅलेंटाईन

सध्या आजूबाजूला सर्व मॅजिकल आहे असे दिसत आहे. त्याच कारण ही खास आहे. फेब्रुव....

Read more