By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 25, 2019 05:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
तुळशीचे रोपटे तर सगळ्याच धर्माचे लोक ठेवतात पण हिंदू धर्मात तुळशीला देवी मानलं जातं. शास्त्रानुसार हिंदूंच्या घरात तुळस नक्की आढळून येते आणि ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपण ही बघितलं असेल की, हिंदूंच्या घरात तुळशीचे रोपटे आढळून येते आणि ते तिला देवी मानून सकाळ संध्याकाळ तिची पूजा करत असतात.
हिंदू धर्मातील जवळपास सगळ्याच घरात तुळस लावलेली दिसते. हे लहानसं रोपट कुटुंबाला वाईट नजर आणि रोगांपासून वाचवते. तुळशीची योग्य वेळी आणि नियमानुसार पूजा केल्यास त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला होऊ शकतो. जर आपल्या घरात तुळस आहे तर, आपल्याला याचे योग्य नियम माहीत असायला हवे. सोबतच आपल्याला हेही माहीत असायला हवे की, तुळस आणि तिचे पान आपले आरोग्य कसे राखू शकतात.
तुळशीच्या पूजेचे नियम :-
अनेक मोठ्या वेबसाईटवर आणि अनेक पुस्तकांत तुळशीचे वर्णन केले आहे. ज्यात तुळशीत आढळणाऱ्या गुणधर्मांना केवळ शास्त्रीयच नाही तर वैज्ञानिक तत्वावर ही लाभदायक मानलं आहे. तुळस एक आयुर्वेदिक रोपटे असण्यासोबतच शास्त्रानुसार पवित्र आणि पूजनीय सुद्धा आहे. जिला सगळे देवी लक्ष्मीचे रूप मानतात. म्हणून हिंदू धर्मातील घरात तुळस असणे आवश्यक मानलं जातं. कारण अस म्हटलं जातं की, ज्या घरात तुळस असते त्या घरात स्वयं नारायण वास करतात. म्हणून आपण तुळशीची नित्य पूजा केली पाहिजे, ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी कायम राहील.
तुळस पूजा नियम व विधी :-
आता आम्ही आपल्याला तुळशीच्या पूजेचे नियम व विधी सांगणार आहोत. जे जाणून घेतल्यावर आपल्याला तसेच करायचे आहे आणि ही विधी सगळ्यांना माहीत नाही. तुळशीची पूजा करायला साफ जागा असावी, पाण्याने भरलेला पूजेचा कलश, धूप अगरबत्ती करून, तुपाचा दिवा आणि हळदीकुंकू लावून रोपटे अंगणात ठेवावे.
आता तुळशी मंत्र – “महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धनी आधी व्याधि हरा नित्यं तुलसी तुम नमोस्तुते।” वाचून हळदीकुंकू वाहून तुपाच्या दिव्याने आरती करावी.
तुळशीची आरती –
जय जय तुलसी माता
सब जग की सुख दाता, वर दाता
जय जय तुलसी माता ।।
सब योगों के ऊपर, सब रोगों के ऊपर
रुज से रक्षा करके भव त्राता
जय जय तुलसी माता।।
बटु पुत्री हे श्यामा, सुर बल्ली हे ग्राम्या
विष्णु प्रिये जो तुमको सेवे, सो नर तर जाता
जय जय तुलसी माता ।।
हरि के शीश विराजत, त्रिभुवन से हो वन्दित
पतित जनो की तारिणी विख्याता
जय जय तुलसी माता ।।
लेकर जन्म विजन में, आई दिव्य भवन में
मानवलोक तुम्ही से सुख संपति पाता
जय जय तुलसी माता ।।
हरि को तुम अति प्यारी, श्यामवरण तुम्हारी
प्रेम अजब हैं उनका तुमसे कैसा नाता
जय जय तुलसी माता ।।
ज्यादिवशी तुळशीचा विवाह असतो त्यादिवशी तुळशीचा शृंगार करणे आणि तुपाचा दिवा लावून तुळशीची आरती करणे फार शुभ मानले जाते. तुळशीला भोगमध्ये पुडी आणि काही गोड पदार्थ देने चांगले असते. तुळशी विवाह दिनी असे करणे चांगले मानले जाते.
रविवारी तुळशी पूजा :-
शास्त्रानुसार एकादशी दिवशी, रविवारी आणि गुरुवारी सूर्य मावळल्यानंतर तुळशीचे पान नाही तोडले पाहिजे. सकाळ संध्याकाळ तुळशीला पाणी देत आरती ही केली पाहिजे. अशाने घरात सकारात्मकता बनून राहते आणि घरावर कुठल्याही नजरेचा प्रभाव पडत नाही. याशिवाय हे ही लक्षात असू द्यावे की, तुळशीचे एकही पान वळायला नको, शिवाय नालीत किंवा झाडण्यातही जायला नको. तुळशीचे पान सर्दी पडशात फार उपयोगी पडते.
सामान्यपणे असे मानले जाते की, सूर्य हा आगीचा गाेळा आहे. त्याच्या पृष्ठभागाव....
अधिक वाचा