ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरे : छायाचित्रकार ते मुख्यमंत्री

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 12:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरे : छायाचित्रकार ते मुख्यमंत्री

शहर : मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुरुवार दी.२८ नोव्हेंबर २०१९ रोजी दादर येथी प्रसिध्द असलेल्या शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर भव्य दिव्य अशा ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री पदाची ६ वाजून ४० मिनिटांनी शपथ घेत आहेत. २४ वर्षापूर्वी १९९५ ला भाजप-शिवसेना युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे ‘मनोहर जोशी’ यांनी शिवतीर्थावर भव्य सोहळ्यात शपथ घेतली होती. त्यानंतर शिवतीर्थावर शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे दुसरे नेते ठरले आहेत. एक उत्तम छायाचित्रकार, लेखक, कवी ते आता मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरे यांचा भन्नाट जीवनप्रवास निश्चित प्रेरणादायी असाच आहे. महाराष्ट्रात ते २९ वे मुख्यमंत्री ठरले आहेत.

उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत २७ जुलै १९६० रोजी झाला. त्यांचे वडील शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, आई स्व. मीनाताई ठाकरे आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा उद्धव ठाकरे यांना लाभला आहे. दादरच्या सुप्रसिद्ध बालमोहन विद्यालयाचे विद्यार्थी असलेले उद्धव ठाकरे जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे स्नातक आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या भोगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौदर्‍याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’ चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण असलेल्या त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भुरळ घातली. त्यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दरजांच्या छायाचित्रकारांच्या छायाचित्रणाचे दर्शन विविध प्रदर्शकांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.

विद्यार्थी दशेपासूनच उद्धव ठाकरे मितभाषी, शांत, संयमी स्वभावाचे होते, असे त्यांचे शिक्षक आवर्जून सांगतात. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीची जवाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्याच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जवाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी २००७ मध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबविली. त्यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष्य केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेनेला यश मिळावे. गेल्या पाच वर्षापासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटक म्हणून सहभागी होता. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाला भरघोस यश शिवसेनेला यश मिळाले.

दरम्यानच्या काळात शिवसेनेवर अनेक संकटे आली. प्रमुख कांही नेते शिवसेना सोडून गेले. राज ठाकरेंनी स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निवर्तले. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी खंबीरपणे नेतृत्व केले. इतकेच काय पण २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेनेचे पुन्हा एकदा भरघोस यश संपादन केले. राज्यात युतीचे सरकार असूनही सरकारच्या चुकीच्या धोरणावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा शिवसेनेशी युती केली. त्यांच्याही चांगला परिणाम झाला. शिवसेनेचे १८ खासदार झाले. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेने लढविली. शिवसेना यात ५६ जागा जिंकता आल्या. मात्र भाजपने दिलेला शब्द पळवा आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत निम्म्या जागा घाव्यात, असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे होते. परंतु भाजप नेते १०५ जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे युती तुटली. मग राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संधान साधून उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा निर्धार केला. त्यासाठी आपले काही धोरणात्मक मुद्देही त्यांनी सोडले. शरद पवारांनी आपला आजवरचा अनुभव पणाला लावित भाजपचा डाव उधळून लावला. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचा महाविकास आघाडीचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला काल बुधवारी आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. आज या आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. या प्रवासात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रचलित कार्यपद्धतीत बदल केले. त्यांचाच नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी, उपचार केंद्र सुरू करून गरजुंसाठी औषध पुरवठाही सुरू केला. मुंबईतील आरोग्य सुविधामध्ये सुधारणा करण्याचा दृष्टीने अनेक रुग्णालयांची निर्मिती, विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण समाजकार्‍याची पायाभरणी केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणार्‍या शिवसेनेच्या समाजकार्‍याची दखल गिनिज बुकनेही घेतली आहे.

विविध कार्यक्रमात किवा महत्वाचा ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ.रश्मी ठाकरे सावली सारख्या सतत दिसतात. ठाकरे कुटुंबातील आजवर कुणीही निवडणूक लढविली नव्हती किवा कोणतेही सत्तापद घेतले नव्हते मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी हा पायंडा मोडला आणि विधानसभेची निवडणूक लढवून जिंकलीहि. त्याचबरोबर खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत. शिवसेनेला सर्वव्यापक स्वरूप त्यांनी दिले, हे मान्यच करावे लागेल. आता त्यांचे दुसरे पुत्र तेजसही राजकरणात सक्रिय होणार का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसं कारभार करणार? त्यांना दोन्ही कॉंग्रेसची साथ कशी लाभणार? हे आता पहावे लागेल.

मागे

वडाच्या पारावार - पवार विरुद्ध पवार
वडाच्या पारावार - पवार विरुद्ध पवार

मन्या : आता सर्वांना कळलं असेल की, मी पुन्हा येणार, असं देवेंद्र फडणवीस का....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापुरातील कॉलेज तरुणीची एक धडपड,स्त्यावर हातगाडीवर पाणीपुरी शेवपुरी व ‘त्या’ तिघी
कोल्हापुरातील कॉलेज तरुणीची एक धडपड,स्त्यावर हातगाडीवर पाणीपुरी शेवपुरी व ‘त्या’ तिघी

कोल्हापुरातील कॉलेज तरुणीची एक धडपड हॉटेल विश्‍वात आपले वेगळे स्थान निर....

Read more