By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 07, 2019 04:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गण्या : मन्या तुमचे वाडीत सार्वजनिक गणपती आणताय, आसं आयकलं.
संत्या : खरं की काय मन्या?
मन्या : आता पोरांची हौस. तिथं आपुन काय बोलणार ?
गण्या : पण त्यांनी तुलाच परमुख केलाय ना ?
संत्या : काय सांगतोस काय? मन्या आसं कधी बी बोलला नाय.
मन्या : माजा त्येना इरोधच व्हता. पर पोर इरेला पेटली.
गण्या : आरं मन्या आपल्या घरा-घरात गणपती हाय आन हा मोठा गणपती कशाला?
मन्या : मी त्येना त्येच म्हणालो. पन पोरं म्हणाली आमी काय वर्गणी काढणार न्हाय. आमी आपसात पैसे जमवताव आणि आपल्या वाडीचा 'राजा' आणताव.
संत्या : मन्या त्या बाजूच्या वाडीत पन पयला हाच परकार घडला. आता घरपट वर्गणी गोला करता. आन केवडा गाजावाजा करतात.
गण्या : गाजावाजा करू देत रं पोर हायत. पण उजाडंपर्यत गणपतीच्या स्टेजंच्या माग जुगार बी खेळतात, आसं आयकलं.
संत्या : आरं देवा, आता काय म्हणावं या पोरास्नी?
गण्या : पयलं कसं चालायचं. रातच्या बारा वाजेपर्यंत सर्वांकडे आरत्या करून झाल्या की मग उजाडेपर्यंत भजनं चालायची.
संत्या : परतेकाकडं दिवस ठरलेला असायचा. मग सर्व मंडळींना कोण मिसळ, नायतर वडापाव आसं येगळं येगळं पदार्थ बनवायचे.
गण्या : ते दिवस गेलं. आता बाजूच्या वाडीत सार्वजनिक गणपती आणला त्याला बी पाचएक वारसं झाली.
संत्या : आता त्यो गणपती न्हाय तर त्या 'वाडीचा राजा' आसं मोठं बॅनर लावून परचार होतोय.
मन्या : ते सर्व मलाबी ठावं हाय. आपली पोरं बी तिकडं जायत व्हती. पण गेल्या वरीस त्यांचं बिनसल.
गण्या : म्हणून इकडे येगळा गणपती आणायचाय त्यांना, आसंच ना.
संत्या : उद्या गावातल्या परतेक वाडीत हीच परथा सुरू होईल.
मन्या : पोर आपल्या मान देतात. ती वाईट काय करीत न्हाईत ना. बास.
गण्या : मण्या, आसं कसं म्हणतोस. जे चूक ते चूकच.
मन्या : ते कसं काय ?
संत्या : आरं आपल्या गावात परतेकाच्या घरात गणपती आणून आपून त्यांचं सर्व 10 दिवस करतोच की.
गण्या : ते काय फक्त चार पाच दिवसच रहातात. आनी आता नोकर्या गेल्यामुळे सगळे चाकरमानी हिकडच हायत की.
संत्या : मग काय झालं ?
मन्या : ह्या चाकरमान्यांनीच पयला पुढाकार घेतलाय. म्हणतात मुंबैत पण अनेकांच्या घरात गणपती असून बी बरीच सार्वजनिक गणेश मंडळ हायत ना !
गण्या : मुंबैचं येगळं आन गावतलं येगळं.
मन्या : आता गाव आन शहर असा फरक रहायला नाय.
गण्या : आसं तू म्हणतोयस.
संत्या : अजुन बी आपुन काय रितीभाती सोडल्या न्हायत.
गण्या : आमाला आपल वाटतं, गावात निदान देवावरनं तरी स्पर्धा होऊ नये.
संत्या : बरोबर. उद्या ते 20 फुटाचा गणपती आणतील तेव्हा आपली पोरं म्हणतील आपण 25 फुटांचा आणूया.
गण्या : त्यांनी रायगड बनवला की हे परतापगड बनवतील आणि आपला परताप दाखवतील.
संत्या : आजूनबी येळ गेलेली न्हाय. मन्या, पोरास्नी समजावं.
गण्या : देव सगळीकडे सारखाच असतो. तुमी मनापासन घरातल्या देवाची पूजा-अर्चा करा. त्याची इटंबना व्हईल आसं काय करू नका.
मन्या : तुमचं बी पटतंय. बगतो एकदा सांगून काय म्हणतात ते.
संत्या : आन आपुन बी येणार्या आपल्या बाप्पाला 'पोरास्नी सदबुद्धी दे', आसं साकडं घालूया !
गण्या : बरोबर हाय. भायर त्यो कोणाचा राजा, महाराजा आसल पर आमचा त्यो बाप्पाच हाय. त्यो आमचं नक्कीच आयकल. उद्या त्यालाच आपून साकडं घालू.
हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाचा उत्सव सोमवार दि. 2 सप्टे....
अधिक वाचा