By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 11:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गण्या : मन्या, काल कुठ गेला व्हतास ?
संत्या : वाट बघून कंटाळलो आमी.
गण्या : आला नाहीस म्हणून काळजी वाटली.
संत्या : आज आता आला नसतास तर आमचा मोर्चा तुझ्या घराकडं येणार व्हता.
मन्या : मला काही बोलू द्याल की नाही ?
गण्या : बोल, बोल आमाला न सांगता कुठ गेला व्हतास ?
मन्या : आपल्या जिल्ह्यात महाजनादेश यात्रा आली व्हती त्या यात्रेला गेलो व्हतो.
संत्या : आर मग आमाला सांगितलं आसतास तर आमी बी आलो असतो.
मन्या : न्हाई आलात तेच बरं झाल.
गण्या : का रं बाबा ?
मन्या : आरं तेथे जाता येताना हाडण हाडं खिळखिळी झाली.
संत्या : कसा गेलास ?
मन्या : एसटीन गेलो. दीड तासाच्या प्रवासाला तीन तास लागले. खड्ड्यांनी रस्त्याची चाळन झालेली हाय.
गण्या : ते काय फक्त आपल्याकडेच न्हाई सर्व भागात तसेच रस्ते हायत.
संत्या : म्हंजे आपल राज्यच खड्ड्यात गेलेलं हाय आस म्हन की.
मन्या : राष्ट्रीय महामार्ग असो, राज्यमार्ग असो, किंवा जिल्हा तालुका अगदी गावापाड्यातील रस्ते तरी कुठे धड हाईत.
गण्या : मग महाजनादेश यात्रेच्या सभेत काय म्हणले तुमचे नेते?
संत्या : ते काय सांगणार ? म्हाराष्ट्राचा कसा इकास केला त्याचच वर्णन करणार.
मन्या : बरोबर. त्यांच्या सरकारमूळ 5 वर्षात कशी प्रगती झाली याचाच पाढा त्यांनी वाचला.
गण्या : कारण त्येंची रथयात्रा जिथण जायची तेथील रस्त्यावरचे खड्डे आधी बुजवून रस्ता गुळगुळीत केला जायचा.
संत्या : मग त्यांना कस कळणार ? रस्त्यावर खड्डे हायत का खड्ड्यात रस्ते हायत ?
मन्या : आस काय नाय हा. त्यांच्या रथयात्रेची सांगता सभा झाल्यावर निघालेल्या यात्रेच्या रथाच चाक बी खड्ड्यात रुतल व्हतच की.
गण्या : हा अपशकुनच म्हनावा का ?
संत्या : त्यात कसला आलाय शकुन अपशकुन.
गण्या : महाभारताच्या लढाईत करणाच्या रथाच चाक भूमीत अडकलेल ऐकल व्हत.
मन्या : कुठ महाभारतात पोचलात. मला फक्त एवढाच सुचवायच व्हत. आमच्या नेत्यांना बी रस्त्याच्या खड्ड्यांना तोंड द्द्याव लागत.
संत्या : आमचे गणपती बी खड्ड्यातून आल आणि खड्ड्यातून गेल. तरी बी खड्डे बुजले न्हाईत.
गण्या : म्हराष्ट्राची प्रगति इकासाच चित्र दाखवणार्यांशी या खड्ड्याच चित्र दाखवाया हवं व्हत.
मन्या : पण त्यांच्या रथाचं चाक खड्ड्यात रुतल्यामुळं त्यांना बी समजलं आसलच की.
गण्या : त्याचा काय बी उपेग नाय.
मन्या : का ?
संत्या : का म्हंजे, आता इलेक्शनची तारीख जाहीर व्हाईल.
गण्या : समद्या नेत्याच लक्ष्य आता या इलेक्शनवर हाय
संत्या : खड्ड्यांकड लक्ष्य द्यायला आता येळ नसणार
गण्या : या आधी रथयात्रेत नेते गुंतले आणि जनता गणपती उत्सवात गुंग राहिली.
संत्या : खड्ड्यातून परवास करीत चाकरमानी उत्सवाला जसे रखडत रखडत आले तसेच उत्सव संपल्यावर बी गेल.
गण्या : तुमचा हा गैरसमज हाय. पावूसच एवढा पडतोय की खड्ड बुजवायला टाईमच मिळत न्हाय.
संत्या : रथयात्रेसाठीचे खड्डे बुजवायला टायम बरा मिळाला ?
मन्या : तुमी काय समजूनच घेणार नाय . तवा आत्ता चला इलेक्शन झाल्यावर बघू.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी, मुंबई उद्योगनगरी, मुंबई मायानगरी अशा विविध उप....
अधिक वाचा