By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 04:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मन्या : संत्या तुझ वय काय ?
संत्या : सत्तर आणि दोन.
मन्या : म्ह्जे ७२ . गण्या तुझं किती ?
गण्या : ह्याच्या पक्षा २ वर्ष आंन मी लहान हाय. पण आज अगदी वयावर घसरलास कसा ?
मन्या : म्हणजे आपुन तिघबी सत्तरी गाठलेले हाय.
संत्या : व्हय. पण आजच अगदी वयाच बरं तुला आठवलं.
मन्या : त्याला कारण बी तसाच हाय. आपण सत्तरी गाठली म्हणजे आपण बैल गाडीतन परवास केलेला हाय.
गण्या : हे काय ईचारण झालं. आर तवा येवढ्या गाड्या न्हवत्या. गावात सांच्याला वस्तीलाच एसटी यायची.
संत्या : दिवसातन दोन येळाच एसटी गाडी यायची. मुंबैला बोटीन आपण गेलो व्हतो.
मन्या : एरवी कूट जायचं म्हंजे चालत नायतर बैल गाडीन
गण्या : ज्याच्याकडे बैलगाडी तो सावकार. त्या बैलाचा थाटच येगला आसायचा 1 मानुस त्यांच्या देखभालीसाठी आसायचा.
संत्या : आऱ माझ्या लग्नाचं व्हराड देखील बैलगाडीतूनच आणवं लागलं होत. दोन बैलगाडयात मानस आली व्हती.
मन्या : कच्च्या रस्त्यातन बैलगाडीतून येताना जस व्हयाच ना तसचं आता मुंबईतन बाप्पासाठी आलेल्या चाकरमान्यांच बसगाड्यांच्या परवासात झालं बग.
संत्या : सोमवारी गणपती येणार म्हणून २-४ दिवस आधीच चाकरमानी मिळल त्या गाडीने येत व्हते.
गण्या : पण ते येळेवर पोचले न्हाईत. रेलवे गाडीने आलेले बी चांगलं ७-८ तास रखाडल.
मन्या : आनं मुंबै-गोवा रोडनं येणारे २४ तासांनी घरात पोचले. ज्या परवासाला १०-१२ तास लागायचे त्याला २४-३० तास लागले.
संत्या : कारण धो-धो पडणारा पाऊस . आण रस्त्यांची झालेली चाळन त्यामुळे बस असो की आणखी काय असो. सर्वांना बैल गाडीतून परवासकरीत आसल्यासारखच वाटलं आसणार.
मन्या : आस त्यांच्या बोलण्यावरण तरी वाटत व्हतं. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे गाड्या हळूहळू खडखड करीत चालत व्हत्या. हाडणहाड मोकळी झाली, आस ते सांगत व्हते.
संत्या : दरवरसाचीच ही बोंब आहे.
गण्या : आपली कोकणी मानस , लय सोसीक बघा.
मन्या : पर सहन तरी किती कराव? याला बी काय मर्यादा हाय का नाय?.
संत्या : कोकणी माणूस सहन करतो म्हणून तर त्याकड दुर्लक्ष केल जात.
मन्या : बरूबर बोललास, वरसानुवरीस तोच चाकरमानी, त्योच रस्ता, तेच खड्डे, तोच पाऊस आण उशीर बी तसाच व्हतोय. पण यावर कोणचं काय बोलत न्हाय.
मन्या : बोलत्यात तेवढ्या पुरत्या सरकारला शिव्या घालत्यात. आपल्या आमदार खासदारांवर तोंड सुख घेत्यात.
संत्या : हे आमदार खासदार बी काय करीत न्हाईत.
मन्या : आण चाकरमानीबी मोठ आंदोलन करीत न्हाईत. कारण ते सोसीक असतात.
गण्या : म्हंजे त्यांनी काय करायला हव?
मन्या : जर २-४ दिसात खड्डे बुजवले न्हाईत, रस्त्यावर खडी डांबर टाकली न्हाई तर एक बी गाडी कोकणात जाव देणार न्हाय, आसा इसारा देवून त्यावरून रस्त्यावर उताराया हव.
संत्या : त्यान काय व्हईल ?
गण्या : ते म्हंतील आता रस्ता मोठा करायचं काम सुरू हाय. एकदा का चौपदरीकरनं झालं आनं कोकण रेलवे मार्गाचेही दुहेरीकरण झालं तर ह्या अडचणी र्हांनार न्हाईत.
मन्या : ते खर आसल तरी आजचा परवास बी सुखाचा करता येईल की खड्डे बुजवून.
संत्या : खड्ड बुजवलं तर खटार्याच्या परवासाचा अनुभव कसा यायचा, ह्या चाकरमान्यांना.
इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वकांक्षी चंद्रयान 2 ची म....
अधिक वाचा