By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 01:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संत्या -: गण्या चल लवकर
गण्या -: आर थांब अस काय वाघ मग लागल्यागत......
संत्या -: चल लवकर मण्या न लवकर बोलीवलय आज पारावार
गण्या -: का र कोण येणार हाय व्हय पारावार
मण्या -: आर लेकाओ किती येळ कवाच्यान वाट बघालोय
संत्या -: आज एवढ काय हाय
मण्या -: काय नाय र
संत्या -: मला वाटल सरकार न सरसकट कर्ज माफी दिली की काय
मण्या -: आर झाली आता निवडणूक आता कसली कर्ज माफी
गण्या -: आले ते निवडून बसले सत्तेत आता त्यांची पोट भरू दे आधी मग ते जाहीरनामे
संत्या -: आता पाच वर्ष बसायच वाट बघत यांची
मण्या -: आर घाबरू नको आता आपल्या महाराष्ट्रात हाय की निवडणूक मग दाखवू
गण्या -: काय दाखवणार त्यांना काय फरक पडत नाय
संत्या -: हे सगळे एकच हाइत सर्व वाटून खात्यात सत्तेत हाइत ते बी आणि विरोधक बी
मण्या -: आता बघ की मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल म्हणी पाच वर्ष झाल्यावर काय फायदा त्याचा
संत्या -: आर हे सर्व आता निवडणूक आली म्हणून नाटक सर्व
गण्या -: महाराष्ट्रात बी तेच होणार नुसती अस्वासण आणि काय
मण्या -: सगळे रिमोटकंट्रोल वर हाय बघ
संत्या -: नावाला देशात लोकशाही आहे बाकी सर्व आता रिमोर्ट वरच आहे.
मण्या -: चल जाऊ सकाळी शेतावर जयायच हाय यांचं काय हे लुटायलाच बसलेत मग कोण बी येवो
संत्या -: बरोबर हाय बघ तुझ चल
मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार यंदाही मुंबईकरांना पाण्यात बुडवणार यात का....
अधिक वाचा