ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आणखी कुणी र्हयालय का?

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 05:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आणखी कुणी र्हयालय का?

शहर : मुंबई

संत्या : आमच बी ठरलय बग ?

मन्या : काय ठरलंय तुमचं ?

गण्या : आमि बी तुझ्या पक्षात येणार ?

मन्या : काय म्हंता काय ?

संत्या : व्हय. परवा तू आरडून आरडून ईचारीत व्हतास.

गण्या : कुणी र्हायलासा का बाकी म्हणून.

मन्या : काय चेष्टा करता राव.

संत्या : चेष्टा न्हाय, खरच येणार.

मन्या : आर गावाच्या देवळात पूजा व्हती. परसाद सर्वांना मिळाला का? हे मी  ईचारीत व्हतो .

गण्या : तू परसाद म्हटला नाहीस.

संत्या : कुणी र्हयालय का ? एवढाच म्हणलास .

गण्या : आता समदा गाव तूज्या पक्षात गेलाच हाय. तवा आमाला वाटलं  त्यासाठीच तू ईचारतोस की काय.

मन्या : हा तसं पायलं तर जवळपास 80 टक्के गाव आमच्या पक्षात आलाय. आजून तुमच्यासारखे कट्टर काय वळत न्हाईत.

संत्या : त्येंची फिकीर नका करू, मोठ-मोठे राजे- महाराजे तुमच्या ताफ्यात डेरेदाखल झालेच हयात की.

मन्या : व्हय. पन विरोधकच शिल्लक ठेवायचा न्हाय, असा आमच्या नेत्यांचा इरादा हाय.

गण्या : मग त्यासाठी तू काय दवंडी पिटणार हायसकी काय ?

मन्या : दवंडी न्हाय पण ज्याची थोडी फार ताकद हाय अशांना  हुडकून  काढणार हाय.

संत्या : गावात तर असा कोन दिसत न्हाय.

मन्या : माज्याकडं तालुक्याची जबाबदारी दिलेली हाय.

गण्या : म्हंजे तालुक्यातल्या नेत्यांवर तुझी नजर हाय तर.

मन्या : आमच्या पक्षात कामं वाटून दिलेली हायत. ह्यावेळी तालुका, जिल्हा आणि राज्यात विरोधकच ठेवायचा न्हाय, असा पक्षश्रेष्टींचा आदेश हाय.

संत्या : म्हणून काय ज्यांच्यावरपूर्वी भ्रष्टाचारचे आरोप झाले त्यांना पण तुमी  घेणार की काय ?

गण्या : कुणावर खुनाचे, बलात्काराचे किंवा लाच घेतल्याचे आरोप असतील तर  त्यांना पण तुमी घेणार की काय ?

मन्या : आमी देशाला भ्रष्टाचार मुक्त करू ईच्छितो.

संत्या : भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात गेला की देश भ्रष्टाचार मुक्त झाला आस समजायचं की काय ?

मन्या : तुमी एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत आरोपीला शिक्षा व्हत न्हाय तोपर्यंत तो गुन्हेगार नसतो.

गण्या : समजलं. आन एखादा नेता न्हाय तुमच्या पक्षात आला तर ?

मन्या : तर पक्षश्रेष्ठी त्यांना आपल्या मर्जीतल्या माणसाकडून योग्य ती समज  देतात.

संत्या : म्हंजे काय ?

गण्या : आमाला समजल आसं बोलं.

मन्या : म्हंजे त्या नेत्याने कधी काळी काही गैरप्रकार केले असतील तर त्याला  ती प्रकरणे नव्याने उघड करण्याची धमकीच द्द्यायची. त्यातून न्हाय आयकला की चौकशीचा ससेमिरा मागे लावायचा. त्यातूनही त्याला अक्कल आली न्हाय तर वेगवेगळे गुन्हे लादून त्याला बेजार करायचं

संत्या : त्या पॅरिस त्यो तुमच्या पक्षात येणारच

गण्या : आमचं तसं काय बी न्हाय.

संत्या : हे तुलाबी ठावं हाय.

मन्या : व्हय. पन तुमच्या अटी काय असणार, त्या सांगून ठेवा. त्या आमच्या  आवाक्यात असल्या तर आमि तुमचा इचार करू. नाय तर आमच्याकडे  जागा फूल झाल्यायात.

गण्या : मग तुमच्या नजरेत र्हयलेले आले तर त्यांना घेनार न्हाय काय ?

मन्या : त्यांना घ्यावंच लागलं. त्यांच्यासाठी पक्षश्रेष्ठी जागा करतील.

संत्या : ते बी बरूबर हाय. आमचा काय फायदा व्हनार हाय तुझ्या पक्षाला.

गण्या : आमी तुज्या पक्षात आलो काय नाय काय ? तुमचा नुकसान व्हनार  नाय.

मन्या : तसं न्हाय. तुमची मत तर आमाला मिळतील. तीच तर महत्वाची हायत. तवा तुमच्या अटी पटकन सांगा.

संत्या : गावात परतेक घरात  पानी मिळू दे, गावाचा विकास व्हऊ दे, हीच आमची मागणी हाय.

मन्या : ठीक हाय. ठरलं तर. उद्याच तुमचा पक्ष परवेश घडवून आणतो. चला  आपण थोडा थोडा चाय घेऊया.... !

 

मागे

आता वेध विधानसभा निवडणुकीचे
आता वेध विधानसभा निवडणुकीचे

हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत श्री गणरायाचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि निर्....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई : गॅस चेंबर
मुंबई : गॅस चेंबर

मुंबई देशाची आर्थिक राजधानी, मुंबई उद्योगनगरी, मुंबई मायानगरी अशा विविध उप....

Read more