By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मंदी म्हंजे काय रं मन्या ?
संत्या : मंदी म्हंजे काय रं मन्या ?
गण्या : त्यो काय सांगणार कप्पाळ.
संत्या : आस म्हणू नगस. त्यो रोज पेपर वाचतो. बातम्या ऐकतो. म्हंजे त्याला म्हायती आसणारच.
गण्या : व्हय रे मन्या, तुला म्हायत हाय मंदी म्हंजे काय ते?
मन्या : आता तुम्हांला समजलं आस सांगाया हव.
संत्या : होय बाबा आमाला समजलं आसच बोल.
मन्या : गेल्या वरसात तुमी किती खर्च करीत व्हतात ? आता किती करताय ? महिन्याला तुमचा खर्च किती ?
संत्या : तू आमची झडतीच घेणार की काय ?
गण्या : आमी ईचारतोय काय अन तू सांगतोयास काय ?
मन्या : त्यातच मंदी म्हंजे काय ते समजणार हाय !
गण्या : आस म्हंतोस व्हय. मग संत्या, कर सुरवात.
संत्या : गेल्या वरिस 60 हजार रुपये खर्च झाले. हा फक्त घरातला खर्च हाय.
मन्या : म्हंजे म्हैन्याला 5 हजार रुपये खर्च केलेत. तुझ काय गण्या ?
गण्या : आमच्याकड दोन तोंड खानारी जास्त हायत. तवा संत्या परिस आमाला 1 हजार महिन्याला जादा लागलं.
मन्या : म्हंजे तुमचा खर्च 72 हजार रुपये झाला. मग आता किती खर्च करता?
संत्या : काटकसर करावी लागते.एका पोराची नोकरी सुटलेय. दूसरा देतो त्याच्यात भागवाव लागतयं.
गण्या : आमची बी तीच गत हाय बग. पोराची चांगली कंपनी बंद पडली. आता कुठतरि टेपररी काम करतोय. तवा त्यान हात आखडता घेतलाय. मग काय काटकसर करावी लागतेयं.
संत्या : यंदा गणपतीला कोणाला बी नव कापड न्हाय घेता आल. अर्धा लीटर दूध बंद केल, पाव लीटर चालू केलयं.
गण्या : पान तंबाखू सोडावा लागला. च्यावर पर बंदी आलीया.
संत्या : दिवसात 7-8 येळला च्या प्यायचो. आता शिकस्तीन 4 येळा च्या व्हतो. पै पावणा कोण आलाच तर अर्धा कप व्हतो.
गण्या : आमच्याकड तर सारखाच च्या व्हायचा. कोण बी आला तरी म्हातारी च्या द्यायची. आता असा च्या नाय देता येत.
संत्या : आर आपल रुटुकुटू चालतया. पण त्यो बबन्या, त्याची हालत लय बेकार झालीया!
गण्या : काय झालं ?
संत्या : त्याच्या पोराची कंपनीच बंद झाली. पोरगं बिर्हाड घेवून आलाय गावात.
मन्या : यालाच मंदी म्हंत्यात. धडाधड कंपन्या कारखाने बंद पडायला लागले की समजायच मंदी हाय.
गण्या : या मंदीला कारण काय ?
मन्या : सर्व जगातच मंदी हाय . त्यामानान आपण चांगले हाव आस केंद्रातल्या अर्थमंत्र्यांनी म्हटलय.
गण्या : ते कस काय ?
संत्या : म्हंजे आपण इतर देशांपेक्षा बर हाय, असच न्हव.
मन्या : व्हय. सरकारनं नोटाबंदी केली, पण त्यामुळे अनेक कारखाने बंद पडले. लाखो लोक बेकार झाल. बेरोजगारी वाढली. त्यामुळं व्यापार उद्योगावर बी परिणाम झाला. लोकांकडे पैसाच न्हाय तर खरेदी काय करणार ?
गण्या : म्हंजे वस्तु संपल्या न्हायत तर कारखान्यात माल काढून काय उपेग न्हाय.
संत्या : कारखानदार कामगार कमी करत्यात, न्हायतर कारखानाच बंद करत्यात.
मन्या : त्यातच बँकांच कर्ज घेऊन न फेडणारे परदेशात पळून गेले. त्यामुळं बँकाकड पन पैसा नाय , अस झाल हाय.
गण्या : मग यावर उपाय काय ?
संत्या : सरकार काय तरी करील की.
मन्या : दोन मोठ्या देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू हाय. दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गण्या : त्याचा इथ काय संबंध ?
मन्या : त्यामुळंच तर मंदी आलीया. आता सरकार पण यावर उपाययोजना करणार हाय. बँकांना 70 हजार कोटी रुपये देणार हाय. कारखानदारासाठी पण सरकार योजना आखणार हाय.
संत्या : मग हे आधीच का केल न्हाय.
गण्या : हे म्हंजे बैल गेला अन झोपा केला, असाच परकार हाय!
आपल्याकडे एक प्रसिद्ध वाक्यप्रचार आहे, 'ज्याच्या हाती ससा तो पारधी' आता थ....
अधिक वाचा