By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2019 03:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संत्या -: चला आता आमचं सरकार येणार.
गण्या -: एवढा हुरळून जाऊ नकोस.
संत्या- : कारे, का?
गण्या -: अजून नेतेमंडळींच्या वाटाघाटीच सुरू आहेत, चर्चा बैठका चालू आहेत.
संत्या -: पण आता सर्व ठरल्याचं समजलं.
गण्या -: जे काही ठरलं त्यावर तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत.
मन्या- ; तेवढं पुरेसं काही.
संत्या -: म्हंजे?
मन्या -: राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ दाखवाव लागेल.
संत्या -: त्यापेक्षा अधिक आमची म्हंजे महाशिवआघाडीची संख्या हाय.
मन्या -: पण राज्यपालांची खात्री पटली पाहिजे.
गण्या -; राजकारणातला गाढा अनुभव असलेले जाणते राजे या सर्वांचे सुत्रधार हायत.
संत्या -: ते सांगतात म्हंजे सरकार स्थापन व्हणार हे नक्की.
गण्या -; मन्या तुला की वाटतं?
मन्या -; आमच्या पक्षाचंच सरकार येणार.
गण्या -: ते कसं आता शक्य हाय?
मन्या -: सहा महिन्यांनंतर पुन्हा निवडणुका व्हतील.
संत्या -: तो वर राष्ट्रपति राजवट राहील, दूसरं कुणी सरकार स्थापन करणार काय असं तुला वाटतंय?
मन्या -: तसं काय, जरी कुणी सत्ता स्थापन केलीच तरी ते फार कल टिकणार न्हायत. त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्याच लागतील.
गण्या -: तेव्हा तुम्हाला बहुमत मिळालं याची काय गॅरंटी?
मन्या -: त्याची तयारी आमी आतापासूनच करतोय.
संत्या -: ती कशी काय?
मन्या - ; पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करणार हायत, आमचे नेते.
संत्या-: धनुष्यबाण सोबत घेऊन आमचंच नुकसान झालय.
गण्या -; लोकांनी तुमच्या महायुतीला बहुमत दिलं व्हतं.
मन्या -; पण ते मुख्यमंत्रीपदासाठी अडून राहयले का.
गण्या -: मग तुम्ही समजून घ्यायला हवं व्हतं.
मन्या -; आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा मिळाल्या तवा मुख्यमंत्री आमचाच व्हायलाहे म्हणणे गैर हाय काय?
गण्या -; तुमच्या वादात राज्यात संभ्रमाची अवस्था निर्माण झाली त्याचं काय?
संत्या -: बरं झालं त्यामुळे आमच्या सायबांचा हेतु तरी साध्य व्हतोय.
गण्या -; तुमचाच मुख्यमंत्री व्हणार तर.
संत्या -: तेवढच न्हाय तर पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री व्हणार.
मन्या -: तो पर्यंत एकत्र व्हायलात तर का?
संत्या -: तुमचे नेते स्वप्नात हायत वाटतं. तुमी स्वप्नाच बघा.
गण्या -; निवडणुकीच्या वेळेही अशीच स्वप्न तुमच्या नेत्यांनी रंगवली. काय उपयोग झाला.
संत्या -; आमचं जमलेलं ह्यांना बघवत न्हाय, दुसरं काय?
मन्या -; ते जमवताना नेतेमंडळी धापा टाकाया लागलेत बघ.
संत्या -; चांगलं काय कारायचं असलं तर आधीच त्यासाठी काळजीपूर्वक आखणी करायला हवी. नंतर मतभेद होऊ नयेत.
लोकशाहीमध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन करणे सर्वांचाच हिताचे असते. महाराष्....
अधिक वाचा