By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2019 08:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गण्या-: मण्या,हे कागद कसले रे?
संत्या-: काल वरच्या वाडीत तू असेच कागद वाटीत व्हतास आस समजलं
मण्या-: त्याच काय हाय,आमच्या पक्षाचे उमेदवार बबनराव हाइत ना त्याचा प्रचार करीत व्हतो. तीच ही पत्रक हाइत
गण्या-: मग तुमचा उमेदवार आपल्या भागात अजून बी कसा नाय आला.
मण्या-: एवढा मोठा मतदारसंघ गल्ली-बोळात किवा प्रत्येक गावात आणि वाड्यांमध्ये घरोघरी उमेदवार जाणार कसा ? दिवस बी कमी हाइता. आचारसंहितेन टायमच बंधन घातलय.
संत्या-: पण तू पक्षाचा जुना इमानदार काय म्हणत्यात ते निष्ठावंत कार्यकर्ता,निदान तुझ्यासाठी तरी आपल्या वाडीत पायधूळ झाडायला हवी होती.
गण्या-: तू तरी तसी विनंती करायला पाहिजे होती
संत्या-: फकस्त रस्त्यावर गाडीतन तुमचा उमेदवार हात हालवित गेलाय
गण्या -: निवडून आल्यावर बी असाच हात दाखविणार की काय?
मण्या-: तुमचा कायतरी गैर समज व्हतोय बघ
संत्या-: मग तो श्यामराव बरे,अपक्ष म्हणून उभे हाइत,घरोघरी फिरतायत
गण्या-: चांगले शिकलेले बी हाइत म्हण,तुमच्या उमेदवारा सारखा डामडौल नाय.
गण्या-: आपल्या तालुक्यात त्याच काम बी हाय.कवा बी जावा त्याचा दरवाजा उघडा असतो
संत्या-:गेल्या टायमाला बबनरावला निवडून दिल्यापासून ते काय इकड तोंड दाखवायला आल नाहीत.
गण्या-: आण आता फिरतायत ते सुद्धा रथातून .
संत्या-: बाबांरवाकड कधी बी गेल तरी सायब बाहेर गेलेत,सायब मीटिंग मधी हाइत तुम्ही उद्या या
गण्या-: दुसर्या दिवशी बी तेच
मण्या-: माला बोलू द्याल का नाय ?
संत्या-: हा हा तू बोल.आमि काय चुकीच बोललो काय ?
गण्या –: तू तुझ्या उमेदवाराची बाजू घेणारच
संत्या-: आणि आमालाच चार गोष्टी सुनावणार
मण्या-: तुमी समजता तास नाय
गण्या-: मग कस हाय
मण्या-: पंतप्रधानांनी किती मोठा निर्णय घेतला पाकिस्तानात घुसून आपल्या जवानांनी अतिरेक्यांचे अड्डे नायसे केले.काश्मिरात ३७० हाटवल
संत्या-: नोटबंदी केल्यान बेकारी वाढली
गण्या -: जीएसटी लावल्यान उध्योग धंदे बंद पडले हे पण सांग की
मण्या-: हाही तुमचा गैर समज आहे आज जगात आपली पावर पंतप्रधानांनी वाढवली हाय
संत्या-: ही काय लोकसभेची निवडणूक हाय ?
गण्या-: ते जाऊ दे पण आता निवडणुकीला उभा असलेल्या तुमच्या उमेदवारानं पाच वर्षात आपल्या भागात काय काम केल ते सांग
संत्या-: आपल्या मतदार संघाच्या विकासासाठिकिती पैसा आणला ?
गण्या-: काय काय सुधारणा केल्या?
संत्या-: कोणाची किती काम केली?
गण्या-: गावातील दवाखाने शाळा सुधारल्या काय ? रस्ते चांगले केले काय?
संत्या-: पाण्यासाठी गावागावात बायका पोरी आज बी वणवण करतात
गण्या-: तुझ्या बापाच आणि त्या रमा काकच मिलकामगारांच घर मिळालं काय
संत्या-: मुंबईत तुझी बहीण झोपडपट्टीत राहती तीला घर मिळणार व्हत मिळालं काय?
गण्या-: निवडणूक आल्यावर काय करणार
मण्या-: तेच तर या पत्रकात हाय,ते वाचा मग प्रश्न ईचारा
संत्या-: मण्या हा पक्षाचा जाहीरनामा हाय,आम्ही तुला जे ईचारल ते मागच्या येळेच्या तुमच्या अशाच जाहीरनाम्यात व्हत
गण्या-: त्या जाहीरनाम्यातली काम नाय केली मग हयातली काय करणार
संत्या-: मण्या,हा पक्षाचा जाहीरनामा हाय.पण या उमेदवारानं केलेल्या पाच वर्षाच्या कामाचा आणि मतदारसंघात पुढे काय करणार ते सांगायला हाव
मण्या-:सत्तेवर आल्यावर एका मतदारसंघाचा इचर नाय करता येत,राज्याचा ईचार करायचा असतो.
गण्या-: मान्य आहे, मग या आमदाराचा फंड गेला कुठ?की त्यान त्याचा वापरच केला नाय?
संत्या-: हे कळायला नको काय ?
गण्या-: तर त्यांना मत देणार.
संत्या-: नायतर अपक्ष चा पर्याय हायच की
गण्या -: तो बी चांगला नसल तर नोटा हायच
मण्या-: ही लोकशाही आहे.तुमी काय ते ठरवा.पण पुढच्या पाच वर्षात आपल्या मतदार संघात अनेक चांगले प्रकल्प सुरू व्हणार हाइत हे लक्षात घ्या
गण्या-: सत्तेवर आलात तर ना
संत्या-: हे बोलणं संपणार नाय,आपण सर्वांना मत द्यायला तयार करूया. पुढचं पुढ बघू लोक ठरवतील काय ते
लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूका. लोकशाहीत मताधिकार जेवढ्या अधिक संख्येने ....
अधिक वाचा