ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वडाच्या पारावार - कुत्र्याचे शेपूट आणि राजकारणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वडाच्या पारावार - कुत्र्याचे शेपूट आणि राजकारणी

शहर : मुंबई

संत्या -: कुत्र्याच शेपूट नळकांडयात घातलं तरी वाकडे ते वाकडेच !

मण्या-: आता काय झाल? तुमच्या मनासारखं झाल नव्ह.

गण्या -: तुमचे सायब मुख्यमंत्री झाले,मग आता पार्टी कावा देणार?

संत्या-: घ्या,ह्याला पार्टीच पाड्लय

मण्या -: त्यानिमित्तान त्याला ढोसायला मिळेल ना.

संत्या -: ती मी त्याला कधी ना कधी देतच असतो.

गण्या -: पण ही पार्टी हक्काची हाय

मण्या-: ती मिळल हा,संत्या तू काय म्हणत व्हतास?

संत्या -: आर,आता कुठ सायबानी सत्ता हाती घेतलीय

मण्या -: मग माशी कुठ शिंकली.

संत्या -: कारभार हाती घ्यायच्या आधीच विरोधकांच्या लाथाळ्या सुरू झाल्यात

मण्या -: विरोधकांच कामच ते हाय,ते करणारच

संत्या -: होय बरोबर हाय,पण सरकार स्थिर तरी होऊ द्या

गण्या -: कदाचित मनसे नेत्यांची ईछा पूर्ण करण्याची घई त्यांना झाली असावी.

संत्या -: तस न्हाय, त्यांना सत्ता हिसकवता आली नायं याच वाईट संत्या -: वाटत असावं

मण्या -: आस काय नाय .

संत्या -: काल सायबानी शपथ घेतल्याबरोबर मंत्र्यांची बैठक घेतली,तर लगेच ह्यांचा पोटात गोळा उठला.

गण्या -: काय म्हणतोस काय ?

तर लगेच टीकेचा सुर ह्यांनी लावला. गुपचुप बैठक का घेतली?

गण्या –:“ आता बैठक कधी घ्यायची,हे सुधा त्यांनाच इचारायच का काय?

संत्या –: पण त्यांनी गुपचुप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नव्हती का ?

गण्या -: एका रात्रीत सर्व बदल घडवून आणले. लोकांची सकाळ उजाडली तीच धक्कादायक बातमीन.

संत्या -: ते चालल,पण जाहीर समारंभात मुख्यमंत्री झाल्यावर बैठक घेतली तर ते खपल नाय,खुपल

मण्या -: तुमी उगाच परचा कावळा करताय.

संत्या -: पराचा कावळा नाय,खरं तेच बोलतोय.

गण्या -: तिन्ही पक्षाचा समान कार्यक्रंम जहीर झाल्यावर पण त्यांनी टीका केलीच की .

संत्या -: मराठवाडा,विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख या कार्यक्रमात नसल्याचं त्यांनी म्हण्ट्लय

मण्या -: यावरून तुमच्या सरकारला असच धारेवर धरणार,हे नक्की.

संत्या -: इरोधासाठी इरोध बराबर नाय. चुकीच्या धोरणावर जरूर टीका करावी

मण्या -: आता त्यांनी चुकीची काय टीका केली ?

संत्या -: महाराष्ट्राच्या समान विकासकामाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यात विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्राच नाव घ्यायचा प्रश्न येतोच कसा ?हे भाग महाराष्ट्रातच हायत ना !

गण्या -: यालाच राजकारण म्हंत्यात

संत्या -: ते गेल महिनाभर बघितलच की

मण्या -: तुमच्या आघाडीत सुधा कुरबुरया सुरू झाल्या की

संत्या -: याला कुरबुरया नाय म्हणत

मण्या -: मग काय ?

संत्या -: कुणाला काय हाव ते मागत्यात

गण्या -: तुमी चुकाच शेधात बसा

संत्या -: पण आपल्यात वाद कश्याला ?

मण्या -: हे बरोबर हाय

गण्या -: ते राजकारणी हाइत

संत्या -: कुत्र्याच शेपूट आणि राजकारणी सारखेच .

गण्या -: कुत्र्याच शेपूट कधी सरळ राहत नाय

संत्या -: सत्ताधार्‍यांनी एखाद चांगलं काम केल,चांगला निर्णय घेतला तरी ते त्याच्यात काय तरी चूक काढणारच

मण्या -: आन आघाडीच सरकार असलं म्हणजे त्यातले घटक पक्ष एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारच

संत्या -: सत्तेत असतात तेव्हा इरोधकांना संपवायचा प्रयत्न करतात

मण्या- : इरोधक सत्तेवर आले की मागचे सत्ताधारी त्यांच्या चुका शोधत त्यांना खाली खेचण्याची संधि शोधत राहतात.

गण्या -: एकुण काय सगळा त्यांच्या सत्तेसाठी खेळ चालतोकी

मण्या -: आपण मात्र विनाकारण वाद घालीत बसतो.चला आपण जाऊया

मागे

कोल्हापुरातील कॉलेज तरुणीची एक धडपड,स्त्यावर हातगाडीवर पाणीपुरी शेवपुरी व ‘त्या’ तिघी
कोल्हापुरातील कॉलेज तरुणीची एक धडपड,स्त्यावर हातगाडीवर पाणीपुरी शेवपुरी व ‘त्या’ तिघी

कोल्हापुरातील कॉलेज तरुणीची एक धडपड हॉटेल विश्‍वात आपले वेगळे स्थान निर....

अधिक वाचा

पुढे  

मुद्दा राष्ट्रीयत्वाचा
मुद्दा राष्ट्रीयत्वाचा

आपल्या देशातील घुसखोरांना शोधून काढण्यासाठी आता राष्ट्रीयत्वाचा मुद्दा ऐ....

Read more