By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 04:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गण्या -: संत्या आर परत आल कीरे मोदी सरकार
संत्या -: व्हय बघूया आता काय करत्यात ते
मण्या -: विरोधी पक्षाची वाट लावली बघ
गण्या -: आर विरोधी पक्ष बी नाय राहिला आता
संत्या -: एक हाय बघ आता एकतर आपल्या देशाच चांगलं व्हईल नायतर
मण्या -: नायतर तर काय र ..
संत्या -: नायतर वाटोळ होईल
गण्या -: अस कस म्हणतोस
संत्या -: आर यांनी जमिनीवरच आपले पाय ठेवले तर बर
मण्या -: म्हणजे र
संत्या -: आर आता आमच कोण वाकड करणार आमच सरकार कोण पडणार म्हणून जर गुरमीत गेले तर संपलं समद
गण्या -: बरोबर बोलतोस बघ तू
मण्या -: सत्तेची गुर्मी लई वाईट आसते बघ
संत्या -: मग काय ह्यांची बी तीच गत व्हईल जी आता झाली
मण्या -: आर ते पाच वर्षानी व्हइल ना तवरका देश किती माग जाईल
गण्या -: आस व्हणार नाय आपण आता चांगला ईचार करू
संत्या -: बरोबर हाय बघ तेवडच हाय आपल्या कड
मण्या -: बघू एक हाती सत्ता आल्यावर चांगलं व्हत म्हणत्यात मोठी मोठी लोक
गण्या -: बघूया काय व्हतय
संत्या -: चला आपल्याला सकाळी शेतावर जयायला पायजे नायतर सरकार कोणाचं बी येवो उपाशी मारायची पाळी येईल बघ
मण्या -: व्हय तुझ बरोबर हाय बघ
गण्या -: जे निवडून आलेत त्यांनी चांगलं काम करायला पाहिजे
संत्या -: आणि जे पडलेत त्यांनी बी आता लोकांच्या जवळ जाऊन त्यांची काम करून घ्यायला पाहिजे
मण्या -: तरच आपल्या देशाच आणि या नेत्यांच भल व्हणार
लोकसभेचा निकाल लागला ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही घोषणा सामान्य मतदारा....
अधिक वाचा