ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आमचं बिनसलयं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आमचं बिनसलयं

शहर : मुंबई

गण्या : कारं, संत्या आणि मन्या एकदम गप्प बसताय?

संत्या : आमचं बिनसलंय.

गण्या : म्हंजेकाय झालयं तरी काय ?

संत्या : त्यांनी शब्द फिरवला.

गण्या : पण निवडणुकीत टीआर आमचं ठरलंय, आमचं ठरलंय असं सांगत व्हतात.

संत्या :  होय, तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं ते आम्हालाच खोटं ठरवतील.

गण्या : मन्या, अरे काय ऐकतोय आम्ही हे ?

मन्या : आमचा आमच्या नेत्यांवर इश्वास हाय.

संत्या : तुमचे नेते खोटे बोलतायत.

मन्या : अजिबात नाही.

संत्या : तुमच्या नेत्यांनी 50-50 चा शब्द दिलाच होता.

मन्या : त्यांनी तसं सांगितलं असतं.पण ते म्हणतात, आम्ही असा शब्दच दिला नाही.

संत्या : मग काय आम्ही खोटे बोलतोय ?

मन्या : आपलं ठरलं होत ना, मग निकालानंतर तुमचे नेते आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत असं का म्हणाले?

संत्या : कारण तुमचे नेते मीच मुख्यमंत्री होणार ? खातेवाटपाचं तुमचं गणितही पटणार व्हतं.

मन्या : तो प्रश्न नंतर सोडवला असता. पण तुमचे नेतेच चर्चेला तयार नाहीत त्याचं काय ?

गण्या : तुमच्या या राजकारणात महाराष्ट्राचं नुकसान व्हतय असं नाय वाटतं?

संत्या : ह्यांच्या नेत्यांनी आमच्या सायबांना खोटं ठरवलं म्हणून त्यांना राग आला.

मन्या : तुमचे नेते वरिष्ठ नेत्यांवर गंभीर टीका करीत व्हते त्याचं काय?

संत्या : एखाद्या निर्णयावर किंवा धोरणावर टीका ही वैयक्तिक टीका नसते.

मन्या : निकालात आमचा पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. तेव्हा महायुतीचं सरकार आमचे नेते स्थापन करतीलच.

गण्या : अरे पण कधी ?

संत्या : आता नेत्यांनी राजीनामा दिलाय.

मन्या : पण काळजीवाहू म्हणून तेच राज्यपालांच्या सल्ल्याने कारभार पाहणार आहेत.

गण्या : तुमच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या म्हणताय मग सत्ता स्थापनेचा दावा नाय केला ?

मन्या : तो ही वेळ येईल तेव्हा करतील.

गण्या : हा मतदारांचा विश्वासघात नव्हे काय ?

मन्या : मतदारांनीच ही कोंडी निर्माण केलीय.

गण्या : कशी काय ?

मन्या : मतदारांनीच कोणा एकाला बहुमत दिलं नाही.

गण्या : कसं देणार ? ज्यांची सत्ता राबवण्याची कुवत आहे ते महायुती आणि महाआघाडी करून लढले? मग मतदारांनी महायुतीला कौल दिलाय. तुमच्यातल्या मतभेदांच खापर मतदारांवर का फोडताय?

मन्या : आम्ही तयार व्हतो पण त्यांनी चर्चेची दारं बंद केली. तरी देखील आमच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला पण त्यांनी फोनचं उचलला नाही. शिवाय  विरोधकांनी केले नाहीत इतके घात त्यांच्या नेत्यांनी केले.

संत्या : सायबांना खोटं बोललेल आवडत नाही. ते खोटं बोलतं नाहीत.

गण्या : जे काही तुमच्यात ठरलंय ते तुम्ही जाहीर का करीत नाही.

संत्या : आमच्या साहेबांनी कधीच जाहीर केलयं.

मन्या : त्यांनी तसा पुरावा सादर केलेला नाही.

संत्या : दोन्ही पक्षाच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकी आधी जी युतीसाठी चर्चा झाली, त्याचवेळी विधानसभेसाठी 50 – 50 चा फॉर्म्युला ठरला व्हतां.

मन्या : तेव्हा काय तसं लेखी लिहून दिलं असेल तर दाखवायचा व्हता.

संत्या : वरिष्ठ नेत्यांच्या शब्दावर आमच्या नेत्यांनी इश्वास ठेवला.

मन्या : मग आताच लेखी प्रस्तावाची मागणी का करतायत?

संत्या : बरबर हाय. तेव्हा आमचे नेते असे बोललेच नाहीत असे आता म्हणतायतं. मग आता विश्वास कसा ठेवायचा?

गण्या : आता हा वाद मिटलाय त्यांचा नेत्यांनी राजीनामा दिलाय. आता राज्यपालांच्या पुढे काय कधी निर्णय घेतात ते पाहू. तेव्हा हा वाद थांबवा.

संत्या : आमच बिनसलयं हेच खरं

 

मागे

खेळांचा राजा - मल्लखांब!
खेळांचा राजा - मल्लखांब!

ही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची! दुस-या बाजीराव पेशव्यांच्या ....

अधिक वाचा

पुढे  

सत्ता कोणाची येणार ?
सत्ता कोणाची येणार ?

महाराष्ट्रात युतीचं बिनसल्यामुळे सत्ता कोणाची येणार ? असा प्रश्न सामान्या....

Read more