ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वडाच्या पारावार - पवार विरुद्ध पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2019 01:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वडाच्या पारावार - पवार विरुद्ध पवार

शहर : मुंबई

मन्या : आता सर्वांना कळलं असेल की, मी पुन्हा येणार, असं देवेंद्र फडणवीस का म्हणत होते.

संत्या : सर्वांना अंधारात ठेऊन असं डाव उरकायची गरज काय?

गण्या : एखाद्या मैदान किंवा राजपाल भवनाच्या प्रांगणातही हा सोहळा जनतेच्या साक्षीने करता आला असता.

संत्या : ही जनतेची फसवणूकच नाही काय?

मन्या : असं कसं म्हणता? आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा मिळविल्या खरं तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं व्हतं.

संत्या : पण तुमच्या नेत्यांनी शब्द पाळला नाही, अस ‘मातोश्री’चं म्हणणं हाय.

गण्या : मग तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी आकारास आली व्हती.

मन्या : हाही तुमचा दावा चुकीचा हाय राज्याला इतका काळ सत्तेशिवाय ठेवणं जनतेच्या हातात भर टाकण्यासारख व्हतं. म्हणून तातडीने सरकार स्थापन होण्याची गरज व्हती.

संत्या : त्यांना सोबत घ्याचाचं व्हतं तर आधीच का तसं केलं गेलं नाय राष्ट्रपती राजवट लागू कराची येळ का येऊ दिली?

मन्या : ते आधी आले असते तर तसंही घडलं असतं, पण ते उशिरा आले.

संत्या : तुमच्या पक्षणं त्यांना ब्लॅकमेल केलं असं म्हटलं जातंय.

मन्या : असे आरोप होत असतात.

गण्या : पण आता बहुमत सिद्ध करावं लागणार हाय.

संत्या : हे बहुमत तुम्ही सिद्ध करू शकणार नाय, असं जाणत्या राजांनी म्हंटलं हाय.

मन्या : ते तेव्हाचं कळेल. कारण ७ दिवस हायत.

संत्या : पन तिनही पक्ष तुमच्या विरोधात एकत्र आले हायत.

गण्या : तुमच्या लोकांनी घरातच चूड लावलीत की.

मन्या : आसं तुम्हाला वाटतं

संत्या : मग तुज मत काय?

मन्या : अजितदादा गेले अनेक दिवस नाराज व्हते.

गण्या : हे बरोबर हाय? आरं तवा अजितदादांचं पुत्र पार्थ पवार यांच्यावरून काका-पुतण्या मतभेद झाले, आसं म्हणतात.

मन्या : त्यानंतर पन दादांनी एकदा राजीनामा दिला व्हता, ते बेपताही झाले व्हते.

संत्या : पन जाणत्या राजांना त्यांनी अंदरत ठेवल. त्याच्याशी बोलून त्यांनी निर्णय घ्यायला हवा व्हता.

मन्या : त्यानं काय झालं आसतं.

संत्या : त्यांनी दादांना समजावलं आसत.

मन्या : पन ही महाविकास आघाडीच त्यांना मान्य नसावी.

गण्या : व्हयं एकदा याबाबतीत पक्षाची बैठक सुरू व्हती तवा बी ते बैठक सोडून भायर गेले व्हते.

मन्या : म्हणजे दादांना शिवसेना-कोंग्रेस बरोबर जाणं पटलेला नव्हतं. इतकंच काय पन त्यांनी यावर आपली नाराजीही व्यक्त केली व्हती.

संत्या : पन आता त्यांचं पक्षच अडचणीत आलाय.

गण्या : पवार विरुद्ध पवार हा काका-पुतण्या मधील वाद या आधीही पुढे आला व्हता.

मन्या : पन काही जन म्हणतात की, काकांचीच पुतण्याला मूक संमती असावी.

संत्या : आसं कारायचं आसतं तर त्यांनी महाविकास आघाडीसाठी प्रयत्नच केले नसते.

मन्या : आरं शेतकर्‍यांच्या प्रश्नावर त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली व्हती.

संत्या : त्यात काय गैर हाय?

मन्या : गैर काय पण त्यांनी फकस्त ४५ मिनिटे शेतकर्‍यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांशी चर्चा झाली, हे कोणालाही पटत नाय.

गण्या : खरे म्हंजे तुम्हाला हवं तसं तुम्हाला हवं तसं घडलं पन आमच्या आशा फोळ ठरल्या म्हणायच्या तर

मन्या : राजकारणात कायबी होऊ शकतं, हे आता तरी मान्य करा.

गण्या : व्हय बाबा! तू म्हणतोस ते खरंय.   

 

मागे

देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द खरा केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द खरा केला.

मुंबई- संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपेत असताना राजकीय भूकंप घडविण्यात आला. अखे....

अधिक वाचा

पुढे  

उद्धव ठाकरे : छायाचित्रकार ते मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे : छायाचित्रकार ते मुख्यमंत्री

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुरुवार दी.२८ नोव्हेंबर २०१९ रोजी दादर य....

Read more