By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 07:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज भल्या पहाटेच पंढरपूरला जाग आली,तशी जाग पंढरपूरला रोजचं येते म्हणा पण आजची जाग जरा निराळीचं होती,भक्तांच्या रांगेतून वाट काढत एक चुणचुणीत पोरगं थेट गाभाऱ्याजवळ येऊन पोहोचलं होतं ,जागलेल्या पांडुरंगान ते पोरगं अचुक हेरलं होतं ,अर्धवट दाढी वाढलेलं पायघोळ सदरा घातलेलं त्या लेखक पोरग्याशी बोलावं अस आज विठ्ठलाला ही राहून राहून वाटत होतं,वर्षानुवर्षे बाजूला उभी मुखी रखुमाई ,देवत्व पसरून अबोल बसलेला गाभारा हे सारं काही डोळ्यात भरून आज युगानुयुगांचा दर्या उधळून द्यावा हे मनोमन ठरवून गाभाऱ्यात नमस्कार करत असलेल्या त्या चुणचुणीत पोरासमोर विठ्ठल मनुष्य रुपात प्रकट झाला,डोळ्यासमोर अचानक प्रकटलेल्या या दिव्यतेजाने त्या पोराचे डोळे अक्षरशः दिपून गेले,इतक्यात हे लेखका ,हे लेखका अश्या स्वराने वातावतरणात एक कमालीचा गारवा पसरला ,त्याला छेद देत पुन्हा विठ्ठलाने हे लेखका अशी साद घातली ,आज काहीतरी अचानकस घडतंय बिघडतय अस मनाशी बडबडत त्या पोराने मिटलेले डोळे उघडले पहातो ,तो साक्षात समोर विठ्ठलासारखा दिसणारा शर्ट पॅन्ट घाततेला माणूस पाहून, पोरग जरा गोंधळलचं, त्याचा गोंधळ कायम ठेवत विठ्ठल म्हणाला हे लेखका,अरे मी विठ्ठल ,अरे ज्याचा आशीर्वाद घ्यायला तू इतक्या दुरून आला आहेस तो मीच विठोबा... पांडुरंग , अश्या धीरगंभिर शब्दांनी बावरलेलं ते पोरगं धीर एकवटून म्हणालं तू विठ्ठल ...होय मीच विठ्ठल ,तुझा देव...
तू विठलं तू नाहीस रे माझा विठ्ठल तो बघ पाठी त्या दगडी मूर्तीत विटेवर उभा आहे..त्या पोराच्या अश्या विश्वासपूर्ण बोलाने विठ्ठलाला जोरदार हसू फुटलं.अरे वेड्या माझ्या पाठच्या मूर्तीवर , दगडावर तुमचा जन्मोजन्म विश्वास पण माणसात माणसासारखा मी तुझ्या समोर साक्षात उभा ठाकलोय तर त्यावर तुझा विश्वास नाही ...व्वा रे लेखका,व्वा साऱ्या जगाला तू शब्दमय करतोस आणि समोर उभा असलेल्या देवाला देवचं नाही म्हणतोस..म्हणतचं विठ्ठल मनात म्हणाला हे कलियुग इथे चमत्कारा शिवाय नमस्कार नाही, हा ही त्यातलाचं मानवप्राणी म्हणतचं विठ्ठलाने गाभाऱ्यात सभोवार एकवार नजर फिरवली ,आणि ओठातलं हसू ओठातचं आवरत हे लेखका मी देव नाही म्हणतोस, जरा तुझ्या आजूबाजूला बघ माझ्या लेकरांची दूरदूर वरून आलेल्या माझ्या भक्तांची माझ्या पुजारी सुरक्षा रक्षकांची तुडूंब गर्दी आहे, आणि इतक्या गर्दीत ही इतका वेळ तू आहेस ना स्थिर उभा.... मघाशी रांगेत ही वैतागला होतास,आणि आता कोणी तुला हटकल की झटकल का सांग पाहू याला काय म्हणशील रे.
इतक्या वेळ स्तब्ध असलेल्या लेखकाच्या डोक्यात आता बराच प्रकाश पडला होता,खांद्यावरची शबनम सावरतचं ...आपण इतक्या वेळ इथे उभे आहोत, आपल्या समोर ते पुजारी आहेत आजूबाजूला ही लोकांची गर्दी, त्या गर्दीला पांगवणारे सुरक्षा रक्षक ही आहेत, पण आपल्याला कोणीच कसे काही करत नाही ,अरे म्हणजे आपण ...म्हणतचं त्याचे हात नकळत जोडले गेले म्हणचे आपणचं मूर्ख देवाला ओळखलं नाही या विचारचक्रात गुंग झालेल्या लेखकाची लागलेली तंद्री पाहून विठलं म्हणाला हे लेखका कसला रे विचार करतोहेस ....
नाही देवा कसला नाही मला माफ करा देवा ,माझी भूल झाली तुझ्या दर्शनाला येथवर आलो आणि तू साक्षात समोर येऊनही मी पामराने तुला ओळखल नाही... न चुक झाली माझी चुक झाली देवा चुक झाली..कटेवर हात ठेवून विठलं हसत म्हणाला होते रे चुक होते ...
आरे वेड्या वर्षानुवर्षे दगडावर विश्वास ठेवत आलाय माणसातला देव ओळखायला चूक होतेच रे तुमची.... असू दे ....
आपल्या समोर उभी मूर्ती हा देवच असल्याची खात्री पटल्यावर लेखकाने जोडलेले हात आणखीन घट्ट केले,त्यात आपल्याला विठ्ठलाने ओळखले आपण लेखक आहोत हे बरोबर ओळखलेल्या देवाला आपल्याला कस ओळखलं ,देव आहे म्हणून ओळखल असेल असे सगळेच प्रश्न लेखकाच्या मनात थैमान घालू लागले,पण तरीसुद्धा माणूस म्हणून पडलेल्या अश्या भाबड्या प्रश्नांचे निरंसन करावे म्हणून आपल्या जाणिवेच्या आयामांना ताण देत ,देवाकडे पहात ,देवा मी लेखक हे कसं ओळखलस आणि या सर्वात तुला माझ्याशीचं का बोलावसं वाटलं ..लेखकाच्या या प्रश्नांवर थोडं आणखी हासत देतो रे लेखका,तुझ्या सगळ्या प्रशांची उत्तरे देतो ,तू चालत आलेली वाट माझ्याच निसर्गाची थेट माझ्या गाभार्यापर्यंत चालत आलीय,तो निसर्ग माझा आणि त्याच्या सगळ्याच वाटा माझ्यापर्यंत येणाऱ्या की रे त्या वाटा ही माझ्याच आणि वाटेवरून चालत आलेला तू ही माझाच , माझा वाट चालणारा ही माझा आणि वाट चुकणारा ही माझाच की रे,त्यात तू लेखक देवत्वाच्या थोडं वरच्या पातळीवर पोहचनारा तू,तुमच्या लेखकांनी निर्माण केलेल पुराण आज ही तुमच्यामुळेच प्रवाही आहे रे..त्यात मी कधी राम होतो तर कधी कृष्ण आदी पुराणापासून आजवर वर्षानुवर्षे असा इथे उभा .....!डोक्यावरच्या आभाळाला ठवूनही हात लावता येत नाही ...नियती रे बाबा नियती.. नियती युगेनयुगे अस हात ठेवून उभं रहायला लावते बघ कटेवर, माझी गोरगरीब पोर अडलेल नडलेले भक्त वारकरी असे सगळेच इथं येतात त्याचं सुख दुःख घेऊन मी उभाच आहे बघ इथे एकटा..एकटा... एकटा या शब्दाने वातावरण काही काळ स्थितप्रज्ञ पहाडासारखं गँभिर झालं,तेवढ्यात डोळ्यात करुणेच्या गँगा यमुनेनी दाटलेली नजर बाजूला उभ्या असलेल्या रखुमाईकडे स्थिर झाली...मी एकटा.... मी कुठे रे एकटा ही काय बाजूला ठाण मांडून उभी आहे माझी रखुमाई... असे म्हणणाऱ्या विठ्ठलाचे शब्द हवेत विरले न विरले तोच बाहेर एकच घोळका आणि त्यांच्या घोषणा विठ्ठलाच्या कानी आल्या ,आवाज कुणाचा साहेबांचा,साहेब म्हणजे साहेब बाकी सगळे गायब,येऊन येऊन येणार कोण अश्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला,अंतर्यामी विठ्ठलाने येणारा भक्त या निवडणुकीतला उमेदवार आहे हे अचूक हेरल होतं..अधीर युगांचा अबोला तसाच धरत रखुमाईवरची नजर विठ्ठलाने हटवून ती लेखकाकडे स्थिर केली,बाहेरच्या घोषणांनी बावरलेल्या लेखकाला धीर देत विठ्ठललं म्हणाला ,लेखका घाबरू नकोस...आहेस तिथेच उभा रहा, तुमच्या लोकशाहीत विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत त्याची तयारी रे म्हणतचं, संथ चंद्रभागेवर आपली नजर विठ्ठलाने स्थिर केली,इतक्यात येणारा घोळका थेट गाभार्याच्या दिशेने येतोय हे पाहून लेखक म्हणाला ,देवा हा तर उमेदवार,,,,तुझ्या दर्शनाला येतोय..होय रे लेकरा येऊ दे, हे ही लेकरू माझंच सगळ्या रांगा चुकवत व्हीआयपी रांगेतून थेट माझ्याजवळ येणारं,येऊ दे ....तू उभा रहा लेखका असाच...इतक्यात काही अंतरावर थांबलेल्या गर्दीतून सर्द पांढऱ्या पोशाखातला उमेदवार पुढे आला विठ्ठलाची यथासांग पूजा करून, विठ्ठल चरणाशी पूर्ण लिन होऊन तो उमेदवार ती गर्दी आपला जवाजमा सावरत ती गर्दी पंगू लागली ..विठ्ठल आणि लेखक दोन्ही ही त्या पाठमोऱ्या उमेदवाराकडे बघू लागले.गाभार्याबाहेर जाताच उमेदवाराला टीव्ही वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनि घेरलं.कचाकच पडणारे फ्लॅश , बोलणाऱ्या तोंडातून निघणाऱ्या त्या शब्दफैरी या सर्वातून एका हुरहूनन्नरी पत्रकाराने उमेदवाराला प्रश्न विचारला,साहेब आपण आज विठ्ठलाकडे काय मागितलत,त्याच तडफेने आपल्या बाह्या सावरत उमेदवाराने उत्तर देण्यास सुरुवात केली मी देवाकडे या राज्याला दुष्काळातून मुक्त कर सुखी ठेव अस मागितलं,माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होऊ दे,या उत्तराने पांडुरंगाचे डोळे चमकले त्या डोळ्यातले भाव लेखकाने त्वरित ओळखले,ती ओळखावी अशीच होती.
इतक्या वेळ तिष्ठत उभ्या राहिलेल्या विठ्ठलाने लेखकाची गमंत करावी म्हणून ..लेखका, काय होतं रे हे .देवा,त्याच जोशाने लेखक म्हणाला, देवा विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.. आपापल्या मतदारसंघात उमेदवार प्रचार करत आहेत,लेखकाच्या प्रश्नावर विठ्ठल म्हणाला मग आता आलेला हा माझा भक्त म्हणून आला होता की ...देवाचे शब्द मध्येच तोडत,
काहीश्या आर्त स्वरातच लेखकाने चारी दिशांना आपली नजर भिरकावली...भिरकावलेल्या नजरेला नजर भिडवतं विठ्ठल म्हणाला दर्शनाला आले आणि मलाच फसवून गेले........
.विठ्ठलाच्या या शब्दांवर ..ते कसं ...देवा..ते कसं,लेखकाचा प्रश्न नध्येच तोडत,ऐकं कस ते ऐक माझ्या जवळ त्यांनी नमस्कार केला मला म्हणाले सुखी ठेव पण स्वतःला मग सगळ्यांना ,मला पुन्हा निवडून येऊ दे माझ्या पक्षाचं सरकार येऊ दे ,जमलं तर मुख्यमंत्री मीच होऊ दे अस कायं कायं रे मागितलं,एवढ मागितलं की काय द्यावं हा मला ही प्रश्न पडला... आणि बाहेर जाताचं जनतेला सुखी ठेव, यंदा दुष्काळ पडू देऊ नको .अस काहीबाही सांगितलं.जनतेला देवाने सुखी ठेवायचे ,जनतेला सुखी ठेवण्याची यांची ईच्या शक्ती जाते रे कुठे,बाहेर जाऊन या वर्षी दुष्काळ पडू नको म्हणून सांगतात. मला हौस आहे काय रे,,, माझ्यालेकरांना बिन पाण्यावाचून असं उन्हातन्हात हिंडताना बघून देव म्हणून मला आनंद होत नाही रे ,या सगळ्याने तर माझ्या देवपणाला भसभसून आग लागते बघ.... दुष्काळ दुष्काळ म्हणून ती चंद्रभागा ही आटून बसली बघ,माझी लेकरं एवढी कशी रे बदलतात माझ्या समोर स्वतःसाठी सार काही मागणारा माणूस माझ्याकडे पाठ वळताच इतकं कस काय बदलू शकतो,याच उत्तर मला देव म्हणूनही गेली अनेक वर्षे झाली तरी सापडलेलंच नाही,बघ.......लेखका ...हे बोलतानाच विठ्ठलाच्या डोळ्यातले दोन थेंब अलगद घरंगल खाली आले ,त्यांना तसेच सोडत विठ्ठल म्हणाला वाहू दे त्यांना ही होऊ दे मोकळे, किती वर्षाचे उन्हाळे त्यांनी पदरात बांधून ठेवले असतील कोण जाणे...... एका दीर्घ उश्याष्याने लेखका बरच बोललो का रे ,नाही देवा बोला ,नाही नाही लेखका बोल तू......
देवा उत्तरं कोणती रे द्यायची, आम्हाला रोज सकाळी उठताना पोटातल्या आजच्या भुकेचा प्रश्न असतो आणि रोज रात्री झोपताना उद्याच्या भुकेचा प्रश्न असतो ,बर ही भूक भागून ही काही जण पारीने खणत चाललेत.
होय लेकरा तुझं म्हणणं खर आहे .....ती पार मला ही अंतर्बाह्य सलते, आणि मग आठवतो माझा पुंडलिक जन्मदात्यांसाठी मला विट टाकून उभा करणारा ,आता जन्मदाते ठेवलेचं जात नाहीतं शाबूत मग उभं रहायला विठ्ठल येईल कुटून ..आणि एकदा आलेल्या विठ्ठलाला हे काय ठेवलंय दगडात अस बांधून. इतक्या वेळ विठ्ठलाचं बोलणं मनपूर्वक ऐकत असलेल्या लेखकाने न राहवून विचारलं देवा तुम्हाला,,, तुमचे अश्रू..... होय येतात की रे अश्रू मला, मला ही भावना आहेत की रानोमाळ सगळं टाकून पायी येत्या लेकरांच रडू ऐकलं की माझं सगळंच रडू गोठतं बघ आणि मग दगड दगडासारखा होऊन जातो अगदी दगडासारखा .न रहावून लेखकाने विचारले देवा त्यांनी सगळं तुमच्याकडे मागितलं तर तुमचं मत नाही मागितलं.लेखकाच्या या प्रश्नाने देव ही बुचकळ्यात पडला ,मला मत ,माझं मत अस पुटपुटतचं आपल्या जाणिवांना ताणत बाजूला उभ्या असलेल्या रखुमाईकडे पाहिलं.हे रखुमाई ...दे की ग उत्तर आता आज उत्तर न देऊन मला पुन्हा उभं करशील विठेवर. माझं मत अस कोणतं ग माझं मत,,हे रखुमाई विठ्ठलाच्या या आर्त हाकेने आतल्या जाणिवांना गेली अनेक वर्षे प्रखरतेचा बांध घातलेली चंद्रभागा जणू रखुमाईच्या तोंडातून बोलू लागली, .रखुमाई म्हणाली या आताच्या लोकशाहीत विठ्ठलरुक्मिणी ला मत ,विचार त्या लेखकाला त्याच्या समोर उभ राहून ही त्याने तुला ओळखल का? ,नाहींना नाहीच,त्यांनी तुझ्याबद्दल ही मत बनवून ठेवलंय त्यांचा विठ्ठल नेहमी कानीकुंडलात कटेवर हात घेऊन पितांबर नेसलेला हाच त्यांचा विठ्ठल.... असा मॉर्डन विठ्ठल कदाचित मानवणार नाही त्यांना ....म्हणताच चंद्रभागेच्या पाण्यावर एक तरंग उठला तो थेट गाभाऱ्यात पोहोचला .....पोहोचलेल्या तरंगावर नजर रोखत रखुमाई पुढे म्हणाली, देवा गेली अठ्ठावीस वर्षे त्यांनी तुमच्याबद्दल मतच बनवून ठेवलं आहे त्या मतात त्यांना आजूबाजूच्या विठ्ठलाचा सखोल विसर पडतो. आणि हो देवा, मी काय तुम्ही काय दगडांना मतं असतात का रे..युगानुयुगे मी अशी उभी मला रे कोणतं मत देवा..... रखुमाईच्या शब्दांनी सारं वातावरण भारून टाकलं, भीमेच्या खोल डोहातली गहिरी शांतता गाभार्यात नितांत भरून राहिली.इतक्या वेळ त्या अवीट गर्दीत ही निश्चल उभ्या असलेल्या लेखकाला कुणीतरी धक्का देत देत गाभाऱ्याबाहेर नेतयं याची जाणीव झाली.जाणिवेतून बाहेर आल्यावर आपण गाभाऱ्याबाहेर उभे आहोत हे पूर्णतः कळलेल्या लेखकाने गाभाऱ्यात चारी दिशांना पाहिलं ,समोर उभा असलेला विठ्ठल केव्हाच अंतर्धान पावला होता ,समोर होती ती एक मोठी पोकळी ,आणि त्या पाठी पुन्हा कटेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल आणि रखुमाई ..............आजूबाजूला पुढे पाठी चाललेल्या गर्दीला आपली मतं होती, पण विठ्ठलाला....
म्हणजे रखुमाईच खर होत तर दगडांनी फक्त धावायचं ऐकायचं बघायचं त्यांना आपली मतं नसतात लोकशाहीत....
लेखनाला आवड,व्यासंग,छंद गंध म्हणण्याइतपत भारदस्त शब्द माझ्या शब्द गाठोड्य....
अधिक वाचा