ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बेस्ट कर्मचार्‍यांचा वाली कोण?

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: जानेवारी 20, 2019 03:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बेस्ट कर्मचार्‍यांचा वाली कोण?

शहर : मुंबई

मुंबईत नऊ दिवस झालेला बेस्ट बसचा संप म्हणजे जसे मिल कामगार संपले तसेच  बेस्ट कर्मचा-यांना संपवण्याचा राजकारण्यांनी आखलेला खूप छान डाव होता. शासनाच्या  नाकर्तेपणामुळे कर्मचार्‍यांना आणि बेस्ट प्रवाशांना पर्यायाने मुंबईकरांना वेठीला धरण्याचा प्रकार यांनी  केलेला होता. बेस्टचा प्रश्न सोडवणे युती सरकारच्या  हातात होते. तरीही हा संप चिघळवून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम त्यांनी केले . निर्णय सर्वस्वी  घेण्याचा अधिकार असताना मुद्दाम सोंग आणून महापालिका आणि  सरकारक एकमेकांच्या परड्यात चेंडू टाकत होते. मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपाची  सत्ता असताना. बेस्टवर शिवसेनेची सत्ता असताना त्यांच्यावर मुंबईतील सर्व कामगारांचे प्रेम आणि विश्वास  असताना हा संप झाला यावर विश्वासच बसत नाही. मराठी माणसासाठी मुंबईकरांसाठी कोणत्याही प्रसंगी धावून जाणारी शिवसेना या संपाबाबत गप्प का होती याच गणितच कळत नाही, की त्यांना आता मराठी माणसाची गरजच उरली नाही. यामागचे नेमकं षड्यंत्र काय आहे ते समोर आणण्याची हीच वेळ आहे.
मिलच्या जमिनी जशा बिल्डरांच्या घशयात घातल्या तसेच बेस्टच्या जमिनी-भूखंडांवर बिल्डरांचा डोळा असल्यामुळे बेस्ट बंद पाडण्याचे कारस्थान होत आहे. यात काही शंका नाही. कायम गर्दी असणारी बेस्ट तोट्यात जाऊच कशी शकते? बेस्ट बस हे एकेकाळचे मुंबईचे वैभव होते. मुंबईची डबलडेकर हे इथल्या सेवेचे फार मोठे वैभव होते. हळूहळू  त्यांची संख्याही अपुरी ठेवली गेली. हे सगळे परप्रांतातून आलेल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांचा धंदा वाढावा म्हणून केले गेले. 80 टक्क्यांपेक्षा जास्त रिक्षा आणि टॅक्सीचालक हे परप्रांतीय आहेत. बेस्टच्या कर्मचार्‍यांना देशोधडीला लावून या परप्रांतीयांची पोटे भरण्याचे महापाप होत आहे बाकी काही नाही.
मुंबईतील लाखो गिरणी कामगारांना असेच देशोधडीला लावले. मुंबईतील गिरणगाव उद्ध्वस्त केले गेले. मुंबईतील गिरणी कामगार हा इथल्या संस्कृतीचा भाग होता. फक्त आणि फक्त राजकारण्यानी आपल्या सत्तेसाठी त्यांना संपवले त्यात कोणी एक पक्ष नाही सर्वांनी मिळूनच ही मलई खाल्ली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे 106 हुतात्मे झाले त्यामध्ये गिरणी कामगार होते. राजकारण, समाजकारणापासून साहित्यापर्यंत गिरणी कामगारांचे योगदान मोठे होते. त्या गिरणी कामगारांना संपवण्याचे काम या नेत्यांनी केले. आता काही उरले नाही तेव्हा आता बेस्टवर यांचा डोळा आहे. पण मुंबईतील बेस्ट वाचली पाहिजे. बेस्ट कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत.
आज न्यायालयाने हस्तक्षेप केला म्हणून हा प्रश्न सुटला पण यासारख्या बाबतीत न्यायलयात जर सामान्य माणसाला जावे लागत असेल तर कशाला पाहिजेत आपल्याला हे नेते आणि मंत्री कशाला यांच्यावर एवढा पैसा खर्च करायचा. बेस्ट तोट्यात आहे म्हणून कामगारांचा पगार वाढत नाही, तो वेळेवर दिला जात नाही. मग आजपर्यंत नगरसेवक आमदार यांचा पगार कसा वेळेवर होतो कधी रोखले का तो चाळीत राहणारा कार्यकर्ता नगरसेवक काय बनतो. एका वर्षात तो चाळीतून फ्लॅट मध्ये जातो मोठी गाडी घेतो कसे शक्य आहे. याचा कधी तरी विचार केलाय. हाच तो महापालिकेचा आणि बेस्टच पैसा. बेस्ट तोट्यात नाही यांनी तोट्यात आणली. मुंबईकरांनी वेळीच यावर लक्ष नाही दिले तर मिल कामगरांसारखे उरलेल्या मूठभर मराठी माणसांना संपवायला या नेत्यांना वेळ लागणार नाही हे नक्की.

मागे

जशास तसं
जशास तसं

मंगळवारी भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला होता. तब्बल बारा विमाने पाक....

अधिक वाचा

पुढे  

वडाच्या पारावर
वडाच्या पारावर

गण्या - : अरे संत्या जेवाण झाल का न्हाय अजून  संत्या -: हे बघ आताच हातावर पाणी ....

Read more