ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सत्ता कोणाची येणार ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 05:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सत्ता कोणाची येणार ?

शहर : मुंबई

महाराष्ट्रात युतीचं बिनसल्यामुळे सत्ता कोणाची येणार ? असा प्रश्न सामान्यांना पडलाय. पुढे काय होणार ? राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणार का? सर्वाधिक जागा मिळविलेल्या भाजपनेही सरकार स्थापन करण्यास असमर्थतं दर्शवली आहे. तेव्हा राजपाळ दुसर्या क्रमांकाच्या शिवसेनेला ही संधी देणार का ? जर राज्यपालांनी तशी संधी दिली तर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार का ? मुख्य म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत का?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना शिवसेनेला मदत केआरएनची सूचना केली आहे. याचा अर्थ काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सत्ता स्थापनेच्या गदारोळात केंद्रस्थानी आहेत. कारणं त्यांनी निकाल लागल्यापासूनआम्हाला जनतेने विरोधी पक्षाची भूमिका बजवण्याचा आदेश दिला आहे. आम्ही जनतेच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो असे मत व्यक्त मांडलयं. दरम्यानच्या काळात स्थापनेचा पेच निर्माण होताच शिवसेनेचे नेते साने राऊत तीन वेळा शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांचा सल्ला घेण्यासाठी गेलो होते. तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेतेही शरद पवारांकडे गेले होते. शरद पवार हे अनुभवी आणि मुरब्बी राजकीय नेतेही आहेत. ते घटनाबाह्य कृती करणार नाहीत. त्यामुळेच कदाचित शिवसेनेला राज्यपाल निमंत्रित करतील का ? हे म्हत्तवाचे ठरणार आहे. तसे निमंत्रण मिळाले वा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हमी दिल्यास शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. त्यातही जर सत्ता स्थापनेच्या खेळात फोडफोडी होत आहे, असे वाटले तरीही राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. पुरेसे संख्याबळ दाखवूनही सेनेला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवले तर शिवसेनाकाँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात धाव घेऊन सत्ता स्थापनेची संधी मिळावी म्हणून याचिका दाखल करू शकतात.

दरम्यानच्या काळात 10 वर्षापूर्वी भाजपने कर्नाटकमध्येऑपरेशन लोट्स नावाने प्रथमचं एक फोरमुळल तयार केला. त्यानुसार विरोधी पक्षातील आमदार आपल्याकडे वळवून सत्ता हस्तगत केली होती. तोच फॉर्म्यूला 2019 मध्येही भाजपने कर्नाटकात अमलात आणला. जुलैमध्ये तेथे कॉँग्रेसच्या 17 आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेसचा बहुमताचा आकडा कमी झाला अनई भपणे सत्ता स्थापन केली. या 17 जणांना पुन्हा भाजपला निवडून आणावे लागणार आहे. गोव्यातही हाच फॉर्म्यूला वापरुन भाजपने तेथेही सत्ता हस्तगत केली. महाराष्ट्रातही अशाच प्रकारचा फॉर्म्यूला भाजप उपयोगात आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण महाराष्ट्रात लवकरच महायुतीच सरकार स्थापन होईल. असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातमी पुन्हा येईन असे त्यांनी ठासून सांगितले होते. तर सत्ता स्थापनेच्या गदारोळातहीच ती वेळ असे संगत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आहे. अशा परिस्थितीत शिवसेना - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार की भाजप या तिघांनाही धोबी पछाड लगावणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे.   

मागे

आमचं बिनसलयं
आमचं बिनसलयं

गण्या : कारं, संत्या आणि मन्या एकदम गप्प बसताय? संत्या : आमचं बिनसलंय. गण्या :....

अधिक वाचा

पुढे  

डाव कोणाचा.? शह कोणाला..!
डाव कोणाचा.? शह कोणाला..!

अखेर महाराष्ट्रात करोडो रुपये खर्च करुण निवडणूक घेऊन काय उपयोग झाली?&....

Read more