By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2019 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
घोडा का अडला ? भाकरी का करपली? तर त्याचं उत्तर न फिरवल्याने असं आहे. आज भाजपाच्या अश्वमेधाचा घोडा झारखंडमध्येही अडल्याचे दिसून आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपचा अश्वमेधाचा घोडा चाफेर उधळला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बहुमत मिळवलं. गेल्या काही वर्षात भाजपने जोरदार मुसंडी मारीत देशातील सुमारे २२ राज्यांमध्ये सत्ता हस्तगत केली. भाजपाच्या या जोरदार मुसंडीमुळे देशात विरोधी पक्ष संपणार, असेच चित्र दिसत होते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे भाजपने गेल्या ४ – ५ वर्षांत त्या दृष्टीने राजकारण केले. त्याचंबरोबर विरोधी पक्षातील दिग्गज नेते आपल्या जाळ्यात ओढले. एखाद्या राज्यात बहुमत मिळाले नसेल तेथे विरोधी पक्षाचे आमदारांचे मोठे गट फोडत आपल्याकडे वळवून ती राज्ये काबीज केली. गोवा – कर्नाटक ही त्याची काही उदाहरणे आहेत. तेथे भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ यशस्वीपणे राबविले. याच पद्धतीने महाराष्ट्रातही सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न फसला. महाराष्ट्रात शिवसेना- कोंग्रेस – राष्ट्रवादी कॉँग्रेसची महाआघाडी सत्तेवर आली. आता झारखंडमध्येही भाजपला सत्ता गमवावी लागणार अशीच चिन्हे आहेत. जेव्हा विजय मिळत असतो तेव्हा दोष झाकले जातात पण जेव्हा पराभव होतो तेव्हा गुण दिसत नाहीत तर दोष उघडे पडतात. २०१८ मध्ये देशातील सुमारे ७१ टक्के भूप्रदेशावर भाजपची सत्ता होती, आज ती ३३ टक्क्यापर्यंत उरली आहे. अवघ्या दीड वर्षांत ७ राज्यांतील भाजपची सत्ता गेली आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भाजपला न भूतो न भविष्यती असे यश मिळवून दिले. त्या यशाच्या धुंदीत असलेले भाजपनेते कोणत्याही राज्यात विधानसभा निवडणूक असली, तरी आपलीच सत्ता येणार या भ्रमात असायचे. महाराष्ट्रात तोच प्रकार घडला. आता झारखंडमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली, असेच म्हणता येईल. झारखंडमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. पण तेथे भाजपाच्या पदरी निराशा आली. याचे सर्वांत महत्वाचे कारण भाजपप्रणीत राज्यांतील नेते मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कामगिरीवर राज्यात राष्ट्रीय पातळीवरील आपल्या कामगिरीचा हवाला देत मते मागतात. देशाचे प्रश्न आणि राज्यातील प्रश्न यातला फरकच लक्षात घेतला नाही. ३७० कलाम हटविले, एनआरसी आणि सीएबी लागू केले, हे राष्ट्रीय मुद्दे आहेत. प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या समस्या असतात. त्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले की, पराभव अटळ ठरतो. मोदींचा करिश्मा कमी होत चालल्याचे प्रथम महाराष्ट्रात दिसून आले आणि झारखंडमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाले , असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
नजीकच्या काळात दिल्लीत निवडणूक होणार आहे. त्याच्या प्रचाराची सुरुवात मोदींनी नुकतीच केली. एनआरसी संबंधी देशभरात जी हिंसक आंदोलने होत आहेत, त्या पार्श्भूमीवर मोदींची सभा दिल्लीत झाली. त्यावेळी एनआरसी फक्त आसाममध्ये लागू करणार असल्याचे ठामपणे सांगत कॉंग्रेसवर जोरदार हल्ला केला. पण यावेळेचे त्यांचे भाषण भाजप बॅकफूटवर गेल्याचेच दर्शवणारे होते. विरोधकांनी केलेल्या टीकेचे मोदींनी आजवर संधीत रूपांतर केल्याचे पाहावयास मिळाले. पण यावेळी त्यांना ती किमया साधली नाही, असेच म्हणावे लागेल. खरेतर मोदींच्या करिष्म्यावर विसंबून राहणा-या राज्यांतील नेत्यांना हा एकप्रकारे इशारच असल्याचे दिसते.
संत्या -: काय रं मन्या, ती 10 रुपयात थाली मिलनार ती कवा मिलनार ? गण्या -: आन ती कुठ....
अधिक वाचा