By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 24, 2019 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नुकताच तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेलो होतो. एका दुकानात चहा पिण्यासाठी गेलो चहा घेतला आणि १० रुपयांचे नाणे पुढे केले पण त्याने ते स्वीकारण्यास नकार दिला .याचे मी कारण विचारले ये ईधर नही चलता असे तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये उत्तर मिळाले पण ते का चालत नाही त्याचे उत्तर कोणाकडेही नव्हते.
वास्तविक हे नाणे भारतीय चलनात वापरण्यासाठी भारतीय सरकारने अधिकृतपणे काढले आहे .ते संपूर्ण भारतात चालले पाहिजे पण नंतर असेही कळले की हे नाणे दक्षिण भारतातच नव्हे तर गुजरात मध्येही चालत नाही .तरी भारत सरकारने हे नाणे या भागात का चालत नाही याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक नाही काय ?
अरुण पां. खटावकर
लालबाग ४०० ०१२
येत्या एक ते दोन महिन्यांत देश निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्याआधीचा शेवट....
अधिक वाचा