ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"मौन की बात"

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 04:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : देश

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली ५ वर्षे सातत्याने आपल्या 'मन की बात' मधून देशवासियांशी सवांद साधत विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. पंतप्रधानपदाचा आपल्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी हा परिपाठ कायम ठेवला आहे. एरवी अनेक छोट्या-छोट्या गोष्टींवरही ते आपली मते व्यक्त करीत असतात. जनतेशी थेट संवाद साधता यावा, यासाठी त्यांनी 'मन की बात' हा उपक्रम सुरु केला आहे. महिन्यातून एकदा जनतेशी संवाद साधतात. शिवाय गरज भासल्यास एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानेही ते जनतेला मार्गदर्शन करीत शासकीय योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत असतात. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे देशभरात वाढत्या प्रमाणात घडणाऱ्या बलात्काराच्या आणि पीडितांचा हत्यांच्या घटना वाढत असता देशभर संतापाचे वातावरण आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचे करण्यात आलेले एन्काऊंटर, उन्नावमधील बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू, महाराष्ट्र विविध भागात अल्पवयीन चिमुरड्यांवर झालेले अत्याचार, त्यांची होत असलेली हत्या, या सर्व प्रकरणाबाबत मात्र पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, याचेच आश्चर्य वाटत आहे. २०१४ मध्ये 'बहुत हुए नारी पर वार अब की बार मोदी सरकार', अशी घोषणा प्रचारात वापरून त्यावेळीही भाजपचे बहुमत मिळवले.  

           २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एअर स्ट्राईकचा मुद्दा प्रचारात आणून भाजपचे सत्ता हस्तगत केली. त्यालाही आता सहा महिने पूर्ण झाले. या सहा महिन्यातही पंतप्रधान मोदी सरकारने जम्मू-काश्मीर विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटविले. शिवाय अन्यही काही निर्णय घेतले. दरम्यानच्या काळात कर्नाटक-महाराष्ट्रात सत्तासंघर्ष रंगला. अशातच हैदराबाद डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या चौघा नराधमांचा पोलिसांनी खात्मा केला. त्यामळे सर्वसामान्यांसह अनेक मान्यवरही पोलिसांच्या कृत्यांचे समर्थकच केले. अशातच उन्नावमध्ये बलात्कार पीडितेचा मृत्यू होताच पुन्हा संतापाची लाट उसळली. यातील आरोपींचा तात्काळ फाशी देण्याची अथवा चकमकीत ठार मारण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याच वेळी नागपुरात पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली. याचप्रमाणे बीड, नाशिक, जालना, मुंबईतही अत्याचाराचा घटना घडल्या. अशाप्रकारे देशाचा विविध राज्यांतही अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

          अशाप्रकारे देशभर बलात्कारांच्या घटनांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात. पंतप्रधान मोदी मात्र मौन धारण करून आहेत. ते यावर काहीच बोलत नाहीत. कर्नाटकात पोटनिवडणुकीचा निकाल लागताच मोदींनी तत्काळ प्रतिक्रिया नोंदवली. कोणत्या छोट्या-छोट्या विषयांवर नरेंद्र मोदी प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण त्याचबरोबर सरकारचा योजनांवरही प्रचारात भर देतात. संधी मिळेल तेथे योजनांच्या यशाची गाथाच उलगडून दाखवितात. पण बलात्कार आणि बलात्कारींचा चकमकीत केलेला खात्मा या घटकांनी देशात प्रचंड खळबळ उडालेली असताना नरेंद्र मोदी या बाबतीत काही प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत नाहीत. एका राज्यातील पोटनिवडणुकीच्या निकालावर ताबडतोब बोलणारे मोदी बलात्कारासारख्या घृणास्पद घटनांवर गप्प का? असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. 

          या घटना म्हणजे राज्यकर्ते, प्रशासक, आणि समाज या तिन्ही घटकांचे अपयश आहे. अपयशाचे वाटेकरी कोण होणार? हा खरा प्रश्न आहे. चांगले ते आम्ही केले, हे सांगण्याची चढाओढ लागते, पण मग अपयशाचे धनी का होत नाहीत ? कारण त्यातून त्यांना आपलाच राजकीय तोटा दिसत असावा, हेच खरे. 
 

मागे

वडाच्या पारावर : याला न्याय म्हणावं का?
वडाच्या पारावर : याला न्याय म्हणावं का?

मन्या-: पोलिसांनी मनावर घेतलं तर लगेच गुन्हेगाराला अद्दल घडवू शकतात. संत....

अधिक वाचा

पुढे  

भेट एका वाढदिवसाची
भेट एका वाढदिवसाची

मी सुचेता. आज माझा वाढदिवस. सचिन सकाळीच म्हणाला, “आज काही करू नकोस, मी लंचला ....

Read more