ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहावी-बारावीच्या गुणपद्धती मोठा बदल

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 12:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दहावी-बारावीच्या गुणपद्धती मोठा बदल

शहर : मुंबई

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावी अकरावी व बारावीच्या गुणपद्धती बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०१९ आणि २०२० पासून इयत्ता ११ वी साठी आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून इयत्ता १२ वी साठी अंतिम मूल्यमापन हे ६५० ऐवजी ६०० गुणांची असेल. सद्यस्थितीतील पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येणाऱ्या ५० गुणान ऐवजी प्राप्त गुणांनचे श्रेणी मध्ये रूपांतर करण्यात येईल. तसेच पर्यावरण शास्त्र या विषयांमध्ये जलसुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट राहील अशी घोषणा शिक्षण मंत्री एडवोकेट आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.  त्याच बरोबर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचे भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयाच्या अंतर्गत गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

त्यामुळे यंदापासून पुन्हा एकदा एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना २० गुण तोंडी परीक्षेचे  ८० गुण लेखी परीक्षेचे असणार आहे.  त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे तर बारावीच्या परीक्षा पद्धतितही २०२० -२०२१ पासून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पर्यावरण शास्त्राला गुण नव्हे तर श्रेणी देण्यात येणार आहेत. तसेच या विषयात जलसुरक्षा हा विषय नव्याने अभ्यासक्रमात दाखल करण्यात येणार आहे. इयत्ता ९ वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमात जलसुरक्षा हा विषय समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.  ११ वी ची वार्षिक परीक्षा ११ वीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आणि १२ वी ची वार्षिक परीक्षा १२ वीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहील.  बीएसई मंडळाच्या धर्तीवर लेखी परीक्षेत किमान किमान 25 टक्के बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही मंडळातील परीक्षा पद्धतीतील तफावत दूर होण्यास मदत होईल. आणि विद्यार्थ्यांना आवश्यक ती कौशले अवगत करता येतील.

मागे

तर १ली ते ८वी  च्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता
तर १ली ते ८वी  च्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता

खेड्या-पाड्यात आजही कित्येक मुलांना ५-६ किलोमीटर अंतरावर शाळेत पायी चालत ज....

अधिक वाचा

पुढे  

कशी पडली महिन्यांची नावे?
कशी पडली महिन्यांची नावे?

जानेवारी -: रोमन देवता जेनस वरून जानेवारी नाव पडले. या देवाला दोन तोंडे असल्य....

Read more