By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 06:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची डेटशीट जाहीर झाली आहे. (CBSE Board Exams 2021 Date Sheet) केंद्रीय माध्यमिक शिक्षाबोर्डाने आज २ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता CBSE Time Table 2021 जाहीर केलं आहे. CBSEचा दहावी आणि बारावीचे वेळापत्रक ऑफिशियल वेबसाइट (CBSE 10th, 12th Board Exams 2021) ची डेट शीट cbse.nic.in आणि www.cbse.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. cbse.nic.in वरून डाऊनलोड करू शकता.
सीबीएसईची बोर्डाची परीक्षा ही ४ मे ते १० जून २०२१ पर्यंत आयोजित केली आहे. दिलेल्या संकेतस्थळावर या दोन्ही इयत्तांचे वेळापत्रक पाहता येणार आहेत.
CBSE च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक
Date-sheet of @cbseindia29 board exams of class X.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) February 2, 2021
Wish you good luck!#CBSE pic.twitter.com/o4I00aONmy
CBSE च्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक
Date-sheet of @cbseindia29 board exams of class Xll.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) February 2, 2021
Wish you good luck!#CBSE pic.twitter.com/LSJAwYpc7j
ऑफलाईन होणार CBSE Board ची परीक्षा CBSE च्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा आयोजित केली जाणार आहे. सीबीएसईच्या परीक्षांचे एडमिट कार्ड एप्रिल २०२१ मध्ये जाहीर होणार आहे. १ मार्च २०२१ मध्ये शाळेत प्रॅक्टिकल परीक्षा घेतली जाणार आहे.
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल १५ जुलै २०२१ रोजी घोषित केले जाणार आहे. यंदा CBSE च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शाळा ऑफलाईन असल्यामुळे ३०% कमी केला आहे.
सर्व लोकांसाठी पॅन कार्ड (Pan Card ) तसेच आधार कार्ड (Aadhaar Card) असणे गरजचे आहे. एखाद्या ....
अधिक वाचा