By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 19, 2019 04:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की, अपयशी विध्यार्थ्यांच्या आत्महत्यांची तुरळक वृत्ते ऐकायला मिळत. आतातर प्रेमभंग, निराशा, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचे कडक बोलणे, एखादी गोष्ट मनासारखी न होणे आदी कारणांमुळेही विद्यार्थी सर्रास आत्महत्या करतात !
आत्महत्येचा विचार का अयोग्य ?
‘आत्महत्या करणे’, हा काही समस्येवरील उपाय नव्हे, उलट तो तर शुद्ध पळपुटेपणाच आहे. आत्महत्येचे विचार येणार्या मुलांनी पुढील विचार करावा. आत्महत्येसाठी केवळ एकच कारण असते, तर जगण्यासाठी अनेक कारणे असतात, उदा.
छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांसारखे राष्ट्रपुरुष; तर संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांसारखे संत यांनाही अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या होत्या. त्यांच्या तुलनेत स्वतःला होणारा त्रास किती आहे, याचा विचार करावा. आज भोगावे लागणारे दुःख काळाच्या ओघात नष्टसुद्धा होईल !
आत्महत्येवरचा खरा उपाय म्हणजे ‘साधना’ !
विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होण्याचे खरे कारण म्हणजे ‘मनाची दुर्बलता’. ध्यानधारणा, नामजप यांसारखी ‘साधना’ केल्यानेच मनोबल वाढून जीवनात स्थिरता येते. असा विद्यार्थी आत्महत्येच्या विचारावर सहज मात करतो.अशा प्रकारचे प्रयोग निरनिराळ्या महाविद्यालयामधूनही केले गेले आहेत आणि त्यांना यामुळे अभ्यासात लाभ दिसून आला आहे. यासाठी मुलांनो, मनोबल वाढवण्यासाठी आजपासूनच साधनेला आरंभ करा !
१. दैनंदिनीचे स्वरूप दैनंदिनीचे स्तंभ साधारणपणे पुढीलप....
अधिक वाचा