By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 04:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबई – येणार्याी वर्षांत कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता अधिक आहे याबद्दलची माहिती एका सर्वेतून समोर आली आहे. डिजीटल आणि नवीन टेक्नॉलॉजी असणाऱ्या क्षेत्रात उमेदवारांची मागणी अधिक आहे. आर्टिफिशल इंटेलिजेन्स, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, रोबॉटिक्स, ब्लॉकचेन आणि डिजिटलचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या वर्षांत सर्वाधिक नोकऱ्या मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या रुपयाची किंमत घसरल्यामुळे आणि उद्योगात तोटा होत असल्यामुळे अनेक कंपनीकडून कर्माचाऱ्यांची संख्या घटवण्यात आली. पण वर्ष 2020 मध्ये नवीन पद्धतीच्या टॉप 10 टेक कंपनीत 60 हजारपेक्षा अधिक नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज फर्म एक्सफीनो कंपनीने लावला आहे. यामध्ये डेटा अॅनालिटिक्स, अमेझॉन वेब सर्विसेज, डेटा सायन्स, ML, NLP, डेटा व्हिज्युलायझेशन, इंटरनेट ऑफ थिंग्स, AI आणि ब्लॉकचेनसारख्या क्षेत्रातील नोकरींचा समावेश असेल.
“या क्षेत्रात कर्माचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. त्यांना तीन लाख ते एक कोटीपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळू शकते. AI, डेटा सायन्स, AWS आणि अॅनालिटिक्समध्ये आतापर्यंत 520 पेक्षा अधिक नोकऱ्या आहेत. ज्यामध्ये 50 लाख ते एक कोटीपर्यंत सॅलरी मिळू शकते”, अशी माहिती एक्सफीनोचे को-फाऊंडर यांनी दिली.
छोट्या पदांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या क्षेत्रात 4 हजार 500 रिक्त जागा आहेत. एक्सफीनोच्या सर्वेनुसार, अधिक सॅलरीचे ऑफर एक्सेंचर, कॅपजेमिनी, आयबीएम, डेल, NVIDIA सारख्या मोठ्या कंपनी देत आहे. स्टार्टअप कंपन्याही टॅलेंटेड कर्माचारी आकर्षित करण्यासाठी मोठ्या कंपन्यांसोबत स्पर्धा करत आहेत.
भारताच्या चांद्रयान-२ प्रकल्पाच्या संचालिका एम. वनिता यांन....
अधिक वाचा