By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जानेवारी -: रोमन देवता जेनस वरून जानेवारी नाव पडले. या देवाला दोन तोंडे असल्याची आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे जानेवारीमध्ये मागील वर्षाला न विसरता नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.
फेब्रुवारी -: या महिन्याची उत्पत्ती रोमन उत्सव फेब्रआ पासून झाली.
मार्च -: रोमच्या बुद्धदेवते मार्टियुस अर्थात मार्स यावरून मार्च महिन्याचे नाव ठेवण्यात आले.
एप्रिल -: लॅटिन भाषेच्या एपिरर या शब्दावरून एप्रिल शब्द आला. या शब्दाचा अर्थ आहे ‘उघडणे’.
मे -: मे महिन्याचे नाव रोमची देवी मायमा वरून निघाले.
जून -: स्वर्गाची राणी जुनो वरून जून हे नाव ठेवण्यात आले.
जुलै -: ज्युलियस सीझर या महिन्यात जन्माला आला, म्हणून जुलै.
ऑगस्ट -: रोमचा राजा ऑगस्टसने याच महिन्यात बर्याच ठिकाणी विजय मिळवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या महिन्याला ऑगस्ट नाव देण्यात आले.
सप्टेंबर -: पूर्वीच्या काळी रोम कॅलेंडरनुसार हा महिना सातवा होता. हे नाव लॅटिन भाषेवरून घेण्यात आले. ज्याचे नातं सात या आकड्याशी आहे.
ऑक्टोबर -: या महिन्याचे नावदेखील लॅटिनच्या ऑक्टोमवरून निघाले. प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये या महिन्याला आठवे स्थान होते. मात्र, आता हा दहावा महिना आहे.
नोव्हेंबर -: या महिन्याचे नाव लॅटिन भाषेच्या नोव्हेनवरून घेण्यात आले. कारण त्या काळात कॅलेंडरनुसार हा महिना नवा होता.
डिसेंबर -: लॅटिन भाषेच्या डिसेमवरून डिसेंबर नाव पडले. ज्याचा अर्थ दहावा असा होता. आता हा वर्षाचा शेवटचा आणि बारावा महिना आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावी अकरावी व बारावीच्या गुणपद्धती बदल करण....
अधिक वाचा