ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशभरातील संस्थांची क्रमवारी जाहीर, मुंबई विद्यापीठ 81 व्या क्रमांकावर 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 01:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशभरातील संस्थांची क्रमवारी जाहीर, मुंबई विद्यापीठ 81 व्या क्रमांकावर 

शहर : मुंबई

देशातील उच्च शिक्षण संस्थाचे मानांकन नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) ने सोमवारी देशभरातील संस्थांची क्रमवारी जाहीर केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हे रँकिंग जाहीर केले आहे. विविध विभागनिहाय अशा 9 क्रमवारी जाहीर करण्यात आल्या.  यामध्ये विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये, महाविद्यालये, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, विधी आदींचा समावेश आहे.
मुंबई विद्यापीठ आणि माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. आयआयटी मुंबई, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, एनएमआयएमएस या संस्थांची क्रमवारी काही प्रमाणात घसरली आहे. तर पुणे विद्यापीठ दहाव्या स्थानावर आहे.
सर्वसाधारण विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने चौथा क्रमांक पटकावून पहिल्या 10 शैक्षणिक संस्थांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर मुंबई विद्यापीठानेही आपल्या कामगिरीमध्ये उत्तम सुधारणा दाखवीत यंदा पहिल्या 100 मध्ये येत 81 व्या क्रमांकावर येऊन सुधारणा केली आहे.

पुढे  

बारावी सीबीएसईचा निकालात मुलींची बाजी 
बारावी सीबीएसईचा निकालात मुलींची बाजी 

बोर्डाच्या 2018-19 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात यंदाही मुलीं....

Read more