ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रत्यक्ष अभ्यास असा करावा !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 04:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रत्यक्ष अभ्यास असा करावा !

शहर : मुंबई

मुलांनो, आपण पहातो की, दोन मुले सारखीच बुद्धीमान (हुशार) असली, तरीसुद्धा त्यापैकी एकाला चांगले गुण मिळतात, तर दुसर्याला अल्प. अभ्यासात मिळणारे यश हे बर्याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. पुढील लेखात याविषयीची काही सूत्रे दिली आहेत, ती अवश्य अभ्यासा !

1 प्रत्येक विषयाचा अभ्यास आवडीने आणि मनापासून करावा : ‘ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे किंवा जी कला शिकावयाची आहे, तिचे महत्त्व आणि लाभ समजून घ्यावेत. त्यानंतर अभ्यासास प्रारंभ करावा. आवडीने आणि मनापासून अभ्यास केल्यामुळे विषयाचे आकलन लवकर होते.’ – कु. मधुरा भोसले

2 सकाळची वेळ शांत असते, तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोन्ही तरतरीत असतात; म्हणून या वेळी अवघड वाटणार्या विषयाचा अभ्यास करावा. जो विषय समजत नाही किंवा अवघड वाटतो, त्या विषयास अधिक वेळ द्यावा. तो विषय किंवा ती प्रश्नोत्तरे दोन-तीन वेळा वाचावीत. नंतर त्यावर वर्गातील बुद्धीमान विद्यार्थी आणि त्या विषयाचे शिक्षक यांच्याशी चर्चा करावी.

3 अभ्यासातील समजलेल्या सूत्रांवर (मुद्यांवर) चिंतन करून ती सूत्रे स्वतःच्या भाषेत लिहून काढावीत. यासाठी प्रथम एखादा परिच्छेद वाचून - ओळींत त्यातील महत्त्वाची सूत्रे लिहिण्याची सवय लावून घ्यावी. नंतर संपूर्ण धड्यातीलच मुख्य सूत्रे लिहून काढावीत.

4 एखाद्या विषयावर साधारणपणे ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मन एकाग्र करणे अवघड असते. त्यामुळे मध्ये मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. विश्रांतीच्या काळात मिनिटे प्रार्थना आणि नामजप करावा.

5 वाचनानंतर लेखन, लेखनानंतर वाचन किंवा पाठांतर, पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास करावा.

मागे

अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?
अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?

आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. ब....

अधिक वाचा

पुढे  

निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचा विचार करणे, हा वेडेपणा !
निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचा विचार करणे, हा वेडेपणा !

काही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की....

Read more