ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Aadhar च्या माध्यमातून Free मध्ये तयार करा Pan Card, हा आहे सोपा मार्ग

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 20, 2020 11:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Aadhar च्या माध्यमातून Free मध्ये तयार करा Pan Card, हा आहे सोपा मार्ग

शहर : मुंबई

सर्व लोकांसाठी पॅन कार्ड (Pan Card ) तसेच आधार कार्ड (Aadhaar Card) असणे गरजचे आहे. एखाद्या व्यक्तीसाठी ते खूप महत्वाचे आहे. या दोन कार्डांशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. आधार कार्डच्यामदतीने काही मिनिटांत ई-पॅन देण्यात येत आहे. पॅनकार्ड बनवण्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरतात.

पॅन कार्ड म्हणजे काय?

पॅनकार्डचा १० अंकी क्रमांक असून तो आयकर विभागाद्वारे ((Department of Income Tax) जारी केला जातो. आज, सर्वात प्रथम जानून घेऊया कोणत्या कार्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे आणि आपल्याला घरून Pan Card कसे प्राप्त करता येईल.

आपल्याला त्वरित ई-पॅन कार्ड मिळेल

प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) म्हणण्यानुसार इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत आधार कार्डद्वारे ई-पॅन कार्ड मिळण्यास सुमारे १० मिनिटे लागतात. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत सुमारे सात लाख पॅनकार्ड (Pan Card) देण्यात आली आहेत.

मोफत पॅन कार्ड बनविता येते

पॅनकार्ड (Pan Card) एनएसडीएल (NSDL) आणि यूटीआयटीएसएलद्वारे (UTITSL) देखील दिले जाते. परंतु या दोन्ही संस्था या सुविधेसाठी काही शुल्क आकारतात. दुसरीकडे, जर आपण आयकर विभाग पोर्टलद्वारे पॅन कार्डसाठी मागणी केली तर आपल्याला कोणतीही फी देण्याची गरज नाही.

पॅन कार्ड पीडीएफ स्वरूपात मिळेल

पॅन कार्डसाठी अर्ज करणार्‍याला पीडीएफ स्वरूपात पॅन कार्ड मिळेल. यात क्यूआर कोड असेल. यात आपले नाव, जन्म तारीख, फोटो इत्यादी महत्वाची माहिती असेल. आपल्याला आपला ई-पॅन डाउनलोड करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला १५ अंकी एक्नॉलेजमेंट क्रमांक मिळेल. तुमच्या पॅनकार्डची सॉफ्ट कॉपी तुमच्या मेल आयडीवरही पाठविली जाईल.

पॅनकार्ड विनामूल्य मिळविण्याचा हा पर्याय

. सर्वप्रथमhttps://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा.. येथे डाव्या बाजूला तुम्हाला आधारद्वारे इन्स्टंट पॅनचा (Instant PAN through Aadhaar ) पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

 

मागे

व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने व्हिडीओचे असे करा GIF फाईलमध्ये रुपांतर
व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने व्हिडीओचे असे करा GIF फाईलमध्ये रुपांतर

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp)आपल्या युजर्सला चांगला अनुभव देण्....

अधिक वाचा

पुढे  

CBSE Date Sheet 2021 : १०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांचं वेळापत्रक जाहीर
CBSE Date Sheet 2021 : १०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांचं वेळापत्रक जाहीर

CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची डेटशीट जाहीर झाली ....

Read more