By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 20, 2019 02:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
खेड्या-पाड्यात आजही कित्येक मुलांना ५-६ किलोमीटर अंतरावर शाळेत पायी चालत जावे लागते. दप्तर सांभाळत एवढी पायपीट करून मुले थकून जातात. काही गावांमध्ये प्राथमिक शाळा १ किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर आहेत. या शाळांमध्ये लहान मुले नाखुषीनेच जातात. शिक्षणाची आवड असूनही शाळा दूर अंतरावर असल्याने मुलांची परवड होते. अशा मुलांना दिलासा देणारा निर्णय शिक्षण परिषदेने घेतला आहे. त्यानुसार ज्या गावांमध्ये वस्ती, पाड्यांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण विद्यार्थ्यांना घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर वरची शाळा नसल्यास वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ज्या गावांमध्ये शाळा किंवा माध्यमिक शाळा नाही, तसेच विद्यार्थ्यांचे घर शाळेपासून अधिक अंतरावर आहे या शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. ज्यांच्या नजीकच्या शाळेमध्ये समावेश होणार नाही अशा कारणांवर यांचा चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देणे गरजेचे असल्याचा निर्णय शिक्षण परिषदेच्या बैठकीत झाला. यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक व त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या राहत्या घराची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे या ठिकाणी पाठवायची आहे.
त्याचबरोबर अशा गाव वस्ती, वाड्या यांची नावे मुख्य कार्यकारी अधिकार्यानी सात दिवसाच्या आत समग्र शिक्षा कार्यालयात सादर करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय प्रत्येक केंद्रांमध्ये विखुरलेल्या व कमी पटसंस्था असलेल्या प्रत्येक केंद्रातील 3 शाळा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यांनी नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल आणि मुक्त शिक्षण विभागाने (आयडॉल) घेतलेल्या....
अधिक वाचा