By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 07:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : चंद्रपूर
चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील कोडशी आश्रम शाळेत हा गैरप्रकार उघडकीस आला आहे. हजेरीपटावर 71 विद्यार्थी पण प्रत्यक्षात 7 विद्यार्थीच उपस्थित असल्याचे आढळून आले. आश्रमशाळेत बनावट पटसंख्या दाखवून सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लुटले जात असल्याचे उघड झाले आहे.विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास वर्गीयांसाठी समाजकल्याण मंत्रालयामार्फत चंद्रपूर जिल्ह्यात 25 ते 26 आश्रम शाळा सुरू आहेत. यापैकी अनेक आश्रमशाळा कागदोपत्रीच असून बोगस विद्यार्थी हजेरीपटावर दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान संस्थाचालक लुटत आहेत. यासंदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.
चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या यवतमाळ, नांदेड आणि बाजूलाच असलेल्या तेलंगणा राज्यात रोजगाराच्या शोधात गेलेल्या पालकांसोबत त्यांची मुलं देखील गेल्याचे वास्तव पुढे आले. हंगाम पूर्ण होताच ते विद्यार्थी परत येतील असे देखील सांगितले गेले. निवासी आश्रम शाळेत कुठल्याही सोयी सुविधा नसून विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. याठिकाणी उपस्थित असलेल्या सातही विद्यार्थ्यांचे जीवन असुरक्षित आहे. यावर संबंधित आश्रम शाळेवरती कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. ही शाळा बंद करण्याचा प्रस्तावही पाठविला आहे. एकूण काय शासनाच्या पैशांची लूट विना अडसर सुरु आहे. यावर कोण आणि कधी कारवाई करणार हा सवाल विचारला जात आहे.
पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणारी इ....
अधिक वाचा