ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास….

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 21, 2020 08:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास….

शहर : देश

अनेक जण आपल्या मित्रांना, कुटुंबियांना पैसे पाठवताना नेटबँकिंग, मनी ट्रान्सफर, मोबाईल वॉलेट, RTGS, NEFT याचा वापर करताना दिसतात. त्वरित पैसे पाठवण्याची ही सुविधा सोपी आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे. पण ही सुविधा जितकी सोपी आहे, तितकी जोखमीचीही आहे.

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना झालेली एक छोटीशी चूक चांगलीच महागात पडू शकते. RTGS, NEFT करताना चुकीच्या नंबरमुळे, पैसे चुकून कोणाच्या दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले तर? पैसे परत कसे मिळणार? पैसे पुन्हा मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तुमच्या बँकेत त्वरित याबाबत सूचना द्या. तुमच्या सूचनेच्या आधारे बँक त्या व्यक्तीला बँकेला सूचना देईल ज्याच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत. चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत करण्यासाठी बँक त्या व्यक्तीची परवानगी मागेल.

तक्रार करु शकता -

ज्या व्यक्तीला पैसे चुकून ट्रान्सफर झाले आहेत, तो व्यक्ती पैसे परत करण्यास नकार देत असल्यास, त्याच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल करता येऊ शकते. पैसे परत न केल्यास, हा अधिकार आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करण्याच्या संदर्भात आहे.

कधी कराल तक्रार -

चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तात्काळ बँकेला याबाबत सूचित करा. तुमचं आणि पैसे ट्रान्सफर झालेल्या व्यक्तीची बँक एकच असल्यास ही प्रोसेस जलद होण्यास मदत होते. पैसे एक-दोन दिवसांत पुन्हा खात्यात जमा होऊ शकतात.

काय आहे आरबीआयचे आदेश -

भारतीय रिझर्व्ह बँकच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लाभार्थ्याच्या खात्याची योग्य माहिती देणे ही लिंक करणाऱ्याची जबाबदारी आहे. जर, काही कारणास्तव, केवळ लिंक करणाऱ्याकडून चूक झाल्यास बँक जबाबदार असणार नाही.

 

मागे

१० वी पास मुलांना नाबार्डमध्ये नोकरीची संधी
१० वी पास मुलांना नाबार्डमध्ये नोकरीची संधी

        मुंबई - NABARD सोबत नोकरी करण्याची एक चांगली संधी आहे. NABARD मध्ये ग्रुपस....

अधिक वाचा

पुढे  

व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने व्हिडीओचे असे करा GIF फाईलमध्ये रुपांतर
व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने व्हिडीओचे असे करा GIF फाईलमध्ये रुपांतर

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp)आपल्या युजर्सला चांगला अनुभव देण्....

Read more