By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 07, 2019 05:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या ८ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या तारखेची अफवा पसरली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागाच्या निकाल दुपारी १ वाजता विविध संकेतस्थळावर पाहता येणार आहे. राज्यभरातून तब्बल १७ लाख ८१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. खालील संकेतस्थळाववर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.
SSC महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहण्यासाठी
www.sscresult.mkcl.org
तसेच www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शनिवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.
काही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की....
अधिक वाचा