By MACHHINDRANATH PAWAR | published: April 11, 2019 09:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
city : akaltara
काल एटापल्लीमध्ये गट्टा भागात निवडणूक पथकाच्या मार्गात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटामध्ये एक जवान जखमी झाला होता. छत्तीसगडमध्ये मतदानाची तयारी करण्यासाठी निघालेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांच्या मार्गावर बुधवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात सलग दुसर्या दिवशी नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी पुलसलगोदी परिसरात बेस कॅम्पवर परतणार्या सी 60 कमांडो पथकावर हल्ला केला. यात तीन जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आधी आयईडीची स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेचच जवानांवर गोळीबार केला. त्याआधी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी अकराच्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला होता. यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.