By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हिंदी चित्रपटात सृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या यशराज फिल्म्स विरोधात 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला आहे. ‘ द इंडियन परफॉमिंग राईटस सोसायटीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द इंडियन परफॉमिंग राईटस सोसायटी गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत व निर्मात्यांचे प्रतींनिधीत्व करते. या सोसायटीच्या तक्रारीनुसार यशराज फिल्म्स ने कलाकारांना काही संशयास्पद करारावर स्वाश्ररी करण्यास भाग पाडले. त्यांना रेडियो स्टेशन्स, संगीत स्ट्रीमिंग फ्लॅटफॉर्मवरुण मानधन घेण्यासही मज्जाव केला. प्राथमिक तपास आणि पुरावयाच्या आधारे यशराज फिल्म्स आणि त्यांचे सर्वेसर्वा असलेले आदित्य चोप्रा ,तसेच उदय चोप्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. गरज भासल्यास आदित्य व उदय चोप्रा यांना चौकशीसाठी बोलवण्यात येईल.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ सिनेनिर्माते....
अधिक वाचा