By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
दिल्लीतील शास्त्री भवनात आज 66 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे, तर आयुष्मान खुराना व तब्बूची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘अंधाधून’ चित्रपटाने हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळविला आहे. या पुरस्कारात जंगली पिक्चर्स निर्मित ‘बढाई हो’ , ‘अंधाधून’, ‘पद्मावत’, राजी या चित्रपटांचे वर्चस्व दिसत आहे.
सर्वोत्तम बालकलाकार श्रीनिवास पोकळे (नाळ), सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक) , सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री-सुरेखा सीक्री (बढाई हो) यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारांची घोषणा खरे तर 24 एप्रिल रोजी केली जाणार होती आणि 3 मे रोजी पुरस्कार वितरण होणार होते. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे या पुरस्कारांची घोषणा लांबणीवर पडली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ निर्माते आणि दिग्ददर्शक जे. ओमप्रकाश यांचे न....
अधिक वाचा