By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ सिनेनिर्माते, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड झाली आहे. या अध्यक्ष पदासाठी डॉ. पटेल आणि प्रसिद्ध नेते मोहन जोशी या दोघांचेच अर्ज झाले होते. त्यावर नाट्यपरिषदेच्या कार्यकारी चर्चा झाली. या बैठकीत पटेल यांचा नावावर शिक्कामोहर्त करण्यात आले. अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली.
१५ डिसेंबर रोजी होणार्या नियामक मंडळाच्या बैठकीत डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचेही प्रसाद कांबळी आणि परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी संगितले. वादविवाद टाळून संमेलन पार पाडण्याच्या आयोजकांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नाटयसंमेलनाध्यक्षांची निवड एकमताने व्हावी, असा अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेचा प्रयत्न होता. डॉ.पटेल यांच्या निवडीने आता पडदा पडला असून आता चाहत्यांना संमेलनाची उत्सुकता लागली आहे.
डॉ. पटेल यांनी थिएटर अकादमी या प्रयोगिक नाटकांसाठीच्या नाटय संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. ‘सामना’, ;सिंहासन’, ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, ‘एक होता विदूषक’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आदि दर्जेदार चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत.
बहुचर्चित सिनेमा तान्हाजी द अनसंग वॉरियरचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अजय देवग....
अधिक वाचा