ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संगीत विश्वातल्या लखलखत्या ताऱ्याचा आज वाढदिवस

By Vishnu Lingayat | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संगीत विश्वातल्या लखलखत्या ताऱ्याचा आज वाढदिवस

शहर : मुंबई

        मुंबई - एका चित्रपटासाठी दोन ऑस्कर मिळवलेला आणि सतत जीवन प्रवास संपण्याच्या विचारत असणारा सुप्रसिद्ध संगीतकार एआर रेहमानचा आज वाढदिवस. ६ जानेवारी १९६६ साली तामिळनाडू मधील एका संगीतिय कुटुंबात त्याचा जन्म झाला. संगीत क्षेत्रात त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला वरच्या स्थरावर नेलं आहे. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्याने संगीत दिलेले काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. 

 

         एआर रेहमानच्या आयुष्यात एक असा काळ होता जेव्हा तो सतत त्याचं जीवन प्रवास संपवण्याचा विचार करत होता. एका मुलाखती दरम्यान त्याने त्याच्या जीवनातील खडतर प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अवघ्या वयाच्या ९व्या वर्षी वडिलांचे छत्र गमावल्याने त्याला मोठा धक्का बसला होता. 

 

       वडिल गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रेहमानच्या खांद्यावर आली. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. संगीतिय घरात जन्म झाल्यामुळे घरात कायम संगीताचे वातावरण आणि अनेक प्रकारचे वाद्य होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे वाद्य विकण्याची वेळ त्याच्यावर आली. 

 

     त्यानंतर वयाच्या ११व्या वर्षी त्याने मित्र शिवमणीसोबत रेहमानने बॅन्ड रूट्ससाठी कि-बोर्ड वाजवण्यास सुरूवात केली आणि त्याच्या संगीतमय प्रवासाला सुरूवात झाली. काहीदिवसांनंतर त्याला लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिककडून शिष्यवृत्ती देखील मिळाली. त्यानंतर त्याने पाश्चात्य शास्त्रीय संगीतात पदवी देखील प्राप्त केली. 

 

       आतापर्यंत रहमानला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. पण, २०१३ मध्ये कॅनडामधील ऑनटारिया नावाच्या एका परिसराच्या रस्त्याला रहमानचं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय रहमानला २००२ मध्ये पद्मश्री आणि २०१० मध्ये पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. याशिवाय त्याला दोन वेळा ऑस्कर, २ वेळा ग्रॅमी आणि ५ वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

मागे

'गुड न्यूज' चा या आठवड्यात १३० कोटींचा टप्पा पार 
'गुड न्यूज' चा या आठवड्यात १३० कोटींचा टप्पा पार 

        मुंबई - अक्षय कुमार, करीना कपूर-खान, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडव....

अधिक वाचा

पुढे  

मलंग सिनेमाच्या रोमँटिक ट्रेलरमध्ये एक वेगळाच थ्रील
मलंग सिनेमाच्या रोमँटिक ट्रेलरमध्ये एक वेगळाच थ्रील

        मुंबई - दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांची सिझलिंग केमिस्ट्री अ....

Read more