By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 07:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल' चित्रपटचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहताना तो दोन वेग-वेगळ्या काळांमध्ये घेऊन जातो. प्रेमाचा काहीसा गोंधळ ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. या रोमँटिक, कॉमेडी, ड्रामा असणाऱ्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय.
ट्रेलरमध्ये १९९० आणि २०२० मधल्या काळातील काहीशी टिपीकल आणि मॉर्डन लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. प्रेमात असणाऱ्या कार्तिकची सारा आणि आरुषीसोबत मजेशीर केमिस्ट्री दाखवण्यात आलीये. 'लव्ह आज कल'मध्ये काही जुन्या गाण्यांना रिक्रिएट करण्यात आलं आहे.
'लव्ह आज कल'मध्ये सारा, कार्तिकशिवाय रणदीप हुड्डा, आरुषी शर्मादेखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतात. २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा हा दुसरा सिक्वेल आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी 'लव्ह आज कल' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सारा-कार्तिकच्या प्रेमाच्या, ब्रेकअपच्या अनेक चर्चा सुरु होत्या. पण आता बहुचर्चित असणारी सारा-कार्तिकची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने दोन वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांच्या�....
अधिक वाचा