ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Ira Khan Wedding:अमिर खानची लेक नुपूर शिखरेची होणार नवरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2023 06:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Ira Khan Wedding:अमिर खानची लेक नुपूर शिखरेची होणार नवरी

शहर : मुंबई

बॉलिवुड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. ईरा खान ही आपल्या बॉयफ्रेंडसोबत 2024 च्या पहिल्या आठवड्यात  लग्न करणार आहे. ईरा ही पारंपारिक पद्धतीने लग्न करण्याअगोदर कोर्ट मॅरेज करण्याचा विचार करत असल्याचं कळतं.

 नुपूर शिखरे या मराठी मुलासोबत अमिर खानची लेक इरा  खान लग्नगाठ बांधणार आहे. सोशल मिडियावर दोघांच्या केळवणाचे फोटो व्हायरल होत आहेत. पारंपारिक पोशाखात दोघंही लग्नापुर्वीचे विधी पार पाडतांना दिसत आहेत.

या दिवशी इरा  आणि नुपूर करणार कोर्ट मॅरेज :

अमिर खानची लेक ही पारंपारिक विवाहाअगोदर शासकीय पद्धतीने नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज  करणार आहेत. त्यानंतर 6 जानेवारीपासून त्यांच्या  लग्नपुर्व विधिंना सुरुवात होईल. काही दिवसांपुर्वी  एका कार्यक्रमादरम्यान अमिर खानने सोशल मिडीयावर ईराच्या लग्नाबद्दल जाहीर केलं होतं.   

सोशल मिडीयावर या दोघांनी  केळवणाचे फोटोसुद्धा केले शेअर :

मराठमोळ्या पद्धतीने शाही विवाह सोहळा होणार राजस्थानमध्ये..! ईरा खान आणि नुपूर शिखरे राजस्थानमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील उदयपुरमध्ये प्री-वेडिंग शुट सुरु होणार आहेत. यानंतर दोघंही सातफेरे घेऊन लग्न बंधनात अडकणार आहेत. ईरा आणि नुपूरचं वेडिंग रिसेप्शन 13 जानेवारीला मुंबईत होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता.

पुढे  

कपिल शर्माला ‘हार्ट अटॅक वाला पराठा’ खाऊ घालणं पडलं महागात; थेट FIR दाखल
कपिल शर्माला ‘हार्ट अटॅक वाला पराठा’ खाऊ घालणं पडलं महागात; थेट FIR दाखल

पंजाबच्या जालंधरमधील मॉडल टाऊन याठिकाणी मिळणारा 'हार्ट अटॅक वाला पराठा' ....

Read more