ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'...त्यावेळी मी खूप रडायचो', आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 09:02 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'...त्यावेळी मी खूप रडायचो', आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण

शहर : मुंबई

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. आमिर बॉलिवूडमधल्या सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गल्ला जमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीत जास्तीत जास्त चित्रपट आमिर खानचे आहेत. परंतु तरीदेखील एक असा काळ होता जेव्हा आमिर खान अपयशी होत होता. त्याला वाटत होतं की त्याचं करिअर बरबाद होत चाललंय. या चिंतेत तो रोज घरात बसून रडायचा. याबाबत स्वतः आमिरनेच खुलासा केला आहे. (Aamir Khan Talks About His Life and Acting Journey in Bennett University)

बेनेट युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांशी बोलताना आमिरने त्याचं करिअर आणि त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. आमिर म्हणाला की, ‘माझं करिअर कधीच सोपं नव्हतं. मी माझ्या करिअरकडे पाहून खूप दुःखी व्हायचो, मला वाटायचं की माझं करिअर आता संपतंय. मी घरात बसून खूप रडायचो.

आमिर त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल एक आठवण सांगताना म्हणाला की, “कयामत से कयामत तक हा चित्रपट यशस्वी झाला. त्यानंतर मी लागोपाठ 8-9 चित्रपट साईन केले. त्यावेळी सगळेच दिग्दर्शक माझ्यासाठी नवीन आणि अनोळखी होते. माझे अनेक चित्रपट सुरु झाले. तेव्हा माध्यमातील लोक मला सांगू लागले की, तू जितके चित्रपट करतोयस त्यापैकी केवळ एकच चित्रपट चालेल, बाकीचे चित्रपट आपटतील.

माझं करिअर बुडत होतं. सर्वांना असं वाटत होतं की, मला किती घाई आहे. अपयशाने मी खूप दुःखी होऊ लागलो होतो. दिवसभर काम करुन मी घरी यायचो आणि माझ्या करिअरचा विचार करुन रडायचो. त्याचवेळी ज्या-ज्या लोकांसोबत काम करण्याची माझी इच्छा होती. ते लोक मात्र माझ्यासोबत काम करायला तयार नव्हते. त्यांना माझ्यासोबत काम करण्याची इच्छादेखील नव्हती.

आमिर म्हणाला की, “कयामत से कयामत तक चित्रपटानंतर पुढील दोन वर्ष मी खूप तणावात होतं. त्याकाळात मी स्वतःला खूप कमी समजू लागलो होतो. मी साईन केलेले एकेक चित्रपट प्रदर्शित होऊ लागले, प्रत्येक चित्रपट अपयशी होत होते. त्यावेळी मला वाटू लागलं की मी आता संपतोय. जगण्यासाठीचा कोणताही रस्ता आता शिल्लक राहिलेला नाही. कारण मला माहीत होतं की, आगामी काळात माझे जे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, तेदेखील वाईटच आहेत. त्यामुळे ते चित्रपटदेखील फ्लॉप होणार आहेत.

त्यानंतर आमिरने वेळ घेतला. आमिर खूप निवडक चित्रपटांमध्ये काम करु लागला. गेल्या काही वर्षांपासून तर आमिर एक-दोन वर्षातून एखादा चित्रपटच करतो. त्या एका चित्रपटावर खूप लक्ष केंद्रित करतो. प्रत्येक चित्रपट परफेक्ट कसा होईल यावर मेहनत घेतो. त्यात त्याला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळेच आता त्याची ओळख मिस्टर परफेक्शनिस्ट अशी झाली आहे.

मागे

Unlock 5: चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचंय, मग 'हे' नियम वाचाच
Unlock 5: चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचंय, मग 'हे' नियम वाचाच

केंद्र सरकारने Unlock 5 अंतर्गत देशातील चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली ....

अधिक वाचा

पुढे  

Rhea Chakraborty bail | अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, शौविक चक्रवर्तीला दिलासा नाहीच!
Rhea Chakraborty bail | अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, शौविक चक्रवर्तीला दिलासा नाहीच!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्....

Read more