ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बिग बॉस मराठी २ च्या स्पर्धकांवर, अभिजीत बिचुकलेच्या पत्नीने केला आरोप

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 31, 2019 02:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बिग बॉस मराठी २ च्या स्पर्धकांवर, अभिजीत बिचुकलेच्या पत्नीने केला आरोप

शहर : देश

अभिजीत बिचुकले आणि बिग बॉस मराठी या घरातील सदस्य यांची पार्श्वभूमी खूपच वेगळी आहे. त्यामुळे इतर सेलिब्रेटींना त्यांना समजून घेणे कठीण जात आहेत, सगळे मिळून त्यांना लक्ष्य करत आहेत आणि या सगळ्यात ते एकटे पडले आहेत अशी अभिजीत बिचुकलेची पत्नी अलंकृता बिचकुले यांचा आरोप आहे.  बिग बॉस मराठी सीझन २ सुरू झाल्यापासून अभिजीत बिचकुले हे नाव चर्चेत आहे. साताऱ्याच्या राजकारणात बिचुकले हे नाव चांगलेच प्रसिद्ध आहे. या घरातील सदस्य यांची पार्श्वभूमी खूपच वेगळी आहे, त्यामुळे इतर सेलिब्रेटींना त्यांना समजून घेणे कठीण जात आहेत. माझे पती हे प्रचंड हुशार आहेत. पण येथील सेलिब्रेटींना त्याची जाणच नाहीये. त्यांनी अजून माझ्या पतींना चांगल्याप्रकारे ओळखलंच नाहीये असे मला वाटते.

बिग बॉस मराठी सीझन २ सुरू झाल्यापासून अभिजीत बिचुकले हे नाव चर्चेत आहे. अनेक लोक एकत्र आले की भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच... त्यात बिग बॉसचे घर म्हटले की हे स्वाभाविकच आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजणे, त्यांच्या सवयी समजून घ्यायला वेळ लागतोच. मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचे घरामध्ये तसे चांगले जमत होते. पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसत आहेत.

 बिग बॉसमध्ये तर आता ग्रुप पडायला देखील सुरुवात झाली आहे. KVR हा पहिला ग्रुप तयार झाला असून या ग्रुपमध्ये किशोरी शहाणे, वीणा जगताप आणि रुपाली भोसले आहेत. या तिघींनी आता तर गप्पा मारण्यासाठी एक जागा देखील ठरवून ठेवली आहे आणि त्याचे “KVR कट्टा” असे नाव देखील ठेवले आहे.

 

मागे

वीरू देवगण यांच्या जळत्या चितेसमोर नुसते बसून होते अमिताभ बच्चन
वीरू देवगण यांच्या जळत्या चितेसमोर नुसते बसून होते अमिताभ बच्चन

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अ‍ॅक्शन कोरिओग्राफर आणि अभिनेता अजय देवगणच....

अधिक वाचा

पुढे  

ऑस्करमध्ये भारताची शान ठरलेल्या 'त्या' बहिणींना नोकरीवरुन काढलं
ऑस्करमध्ये भारताची शान ठरलेल्या 'त्या' बहिणींना नोकरीवरुन काढलं

ऑस्कर पुरस्कार विजेत्या 'Period. End of Sentence' या माहितीपटाने अनेकांचं लक्ष वेधलं ह....

Read more