By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 06:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
निर्माता अजय कुमार सिंह यांनी अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणाल यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. अमिषानं एका सिनेमासाठी आपल्याकडून 2.5 कोटी रुपये घेतले होते. असं या निर्मात्यानं सांगितलं. प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल बऱ्याच वर्षांपासून सिनेमांपासून दूर असली तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने ती नेहमीच चर्चेत असते. अनेकदा सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर केल्यानं 44 वर्षीय अमिषाला नेटिझन्सच्या टीकेला समोरं जाव लागलं आहे. पण सध्या अमिषा बाबत एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार एका निर्मात्यानं अमिषा पटेल आणि कुणाल यांना देसी मॅजिक या सिनेमासाठी 2.5 कोटी रुपये दिले होते. 2013मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली. अमिषानं या निर्मात्याला 2018 मध्ये हा सिनेमा रिलीज होईल असं सांगितलं होतं. मात्र हा सिनेमा रिलीज झालाच नाही. असं सांगत अजय कुमार सिंहनं अमिषा आणि कुणालवर खटला दाखल केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलवर पुन्हा एकदा फसवणूकीचा आरोप लावण्यात आला आह....
अधिक वाचा