By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सलमान खान. गेल्या काही वर्षात सलमानने रोमान्सपासून ते कॉमेडीपर्यंत, अॅक्शन ते दुहेरी भूमिकेपर्यंत असे कोणतेच काम नसेल जे त्याने करून पाहिले नाही. सलमानचा असा एकही चित्रपट नाही ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिस किंग, टागर ऑफ बॉलिवूड, भाईजान, सल्लू अशी अनेक विशेषणे सलमानच्या नावापुढे लावण्यात येतात.
आज २७ डिसेंबर रोजी अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या भाईजानचा वाढदिवस आहे. पण हाच भाईजान किती वर्षांचा झाला असा प्रश्न अनेकांना पडतो. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. आज सलमान ५४ वर्षांचा झाला. त्याच्या वडिलांचे नाव सलीम खान आणि आईचे नाव सलमा खान. सलमानला दोन बहिणी आहेत. अर्पिता आणि अल्विरा अशी त्यांची नावे आहेत. तसेच सलमानला अरबाज आणि सोहेल हे दोन भाऊ देखील आहेत.
सलमानने १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने सहकलाकार म्हणून काम केले होते. १९८९ साली सूरज बडजात्याच्या प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटाने सलमानला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर माधुरी दीक्षितसोबतच्या ‘हम आपके है कौन’ चित्रपटातून सलमान पुन्हा एकदा यशाच्या शिखऱावर पोहचला. सूरज बरजातया दिग्दर्शित हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता.
बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीचं निधन झालं आहे. लक्ष्य, अंदाज, सला....
अधिक वाचा