By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 07, 2021 02:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही पती विराट कोहलीसोबत तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत वेळ (Anushka Sharma Gets Angry On Photographer) घालवत होती. त्यांचे हे खाजगी क्षण एका फोटोग्राफरने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले. विराट अनुष्काचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. पण, वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या या फोटोग्राफरवर अनुष्का चांगलीच संतापली आहे.
तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर करुन फोटोग्राफर आणि त्या पब्लिकेशनबाबत आपला रोष व्यक्त केला. “फोटोग्राफर आणि पब्लिकेशनला वारंवार मनाई केल्यावरही ते आमच्या खाजगी आयुष्यात डोकावत आहेत. कृपया हे थांबवा”, असं कॅप्शन तिने या स्टोरीला दिलं.
या पब्लिकेशनने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये अनुष्का विराटसोबत बाल्कनीमध्ये बसून वेळ घालवताना दिसत आहे.
यापूर्वीही अनुष्काने अनेकदा सांगितलं आहे की ते त्यांच्या बाळाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवू इच्छितात. अनुष्का या महिन्यात आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती तिचा जास्तीत जास्त वेळ विराट आणि कुटुंबासोबत घालवत आहे.
अनुष्काने इतक्यात अनेक फोटो शेअर केले. ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.
नुसकंत, अनुष्का शर्माने वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केला. या फोटोशूटमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटोंमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर प्रेग्नेसी ग्लो दिसतो आहे.
हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर य....
अधिक वाचा