By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
‘बिग बॉस’ची उपविजेती आणि सलमान खानची सह-अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘बिग बॉस’ गाजवल्यानंतर ती सलमानसह ‘जय हो’ या चित्रपटात झळकली होती. मात्र, एका पोस्टमुळे आता तिच्या चाहत्यावर्गाला चांगलाच धक्का बसला आहे. अभिनेत्री सना खानने चित्रपट सृष्टीला (Film Industry) ‘अलविदा’ म्हणत, धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहीत तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत सनाने (Sana Khan) म्हटले की, ‘सगळ्या बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, यापुढे चित्रपट सृष्टीत कुठल्याही कामासाठी मला बोलवण्यात येऊ नये. आतापर्यंतच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार’. सनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याचबरोबर तिचे नाराज चाहते कमेंट्स करून प्रश्न विचारत आहेत. तिने असा निर्णय का घेतला याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. यावरही तिने उत्तर दिले आहे.
My happiest moment
मागे
Rhea Chakraborty bail | अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, शौविक चक्रवर्तीला दिलासा नाहीच!
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्....
अधिक वाचा